एक्स्प्लोर

भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी! पगार मिळणार 56 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भारतीय नौदलात भरती होण्याची एक उत्तम संधी आली आहे.

Indian Navy job  : सरकारी नोकरीची  (Govt Job) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भारतीय नौदलात भरती (Indian Navy job) होण्याची एक उत्तम संधी आली आहे. भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) कार्यकारी शाखेतील अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती 2025 सालासाठी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 

कोण अर्ज करु शकतात?

या भरतीसाठी फक्त तेच उमेदवार पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बीई/बी.टेक पदवी घेतली आहे. याशिवाय एमसीए, एम.एससी किंवा एमबीए सारख्या पदवी असलेले उमेदवार देखील काही पदांसाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर, उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2000 ते 1 जानेवारी 2005 दरम्यान असावा.

किती पदांसाठी भरती होणार?

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 15 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ही पदे एसएससी कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान) संवर्गात येतात. निवडलेल्या उमेदवारांना भारतीय नौदलाच्या विविध युनिट्स आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये नियुक्ती दिली जाईल.

तुम्हाला किती पगार मिळेल?

भारतीय नौदलात निवड झालेल्या एसएससी कार्यकारी अधिकाऱ्यांना सुरुवातीला दरमहा सुमारे 56100 रुपये वेतन दिले जाते. याशिवाय त्यांना महागाई भत्ता, प्रवास भत्ता, गणवेश भत्ता आणि इतर सुविधा देखील मिळतात. कालांतराने हा पगारही वाढतो. नौदलात काम करणाऱ्यांना वैद्यकीय सुविधा, कुटुंबासाठी निवास आणि कॅन्टीन सुविधा अशा अनेक सुविधा देखील मिळतात.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड गुणवत्ता यादी, शैक्षणिक पात्रता आणि एसएसबी मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा होणार नाही. पात्र उमेदवारांना थेट एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया होईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार www.joinindiannavy.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे, म्हणून वेळेत फॉर्म भरा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे. दरम्यान, जे उमेदवार पात्र आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहेय तातडीने पात्र उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावेत असं आवाहन करण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

ESIC Recruitment 2025 : 2 लाखापर्यंत पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी, ESIC मध्ये असिस्टंट प्रोफेसरपदाची भरती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget