एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jhund | नागराजचा झुंड खरंच ओटीटीवर येणार?
मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन असलेल्या झुंड चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे.हा चित्रपट 8 मेला प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळं सगळंच थांबलं
मुंबई : सैराट, फॅंड्रीसारखे तगडे सिनेमे दिल्यानंतर नागराज मंजुळेने हिंदीत उडी ठोकली. विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. भवताली असलेल्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल टीम बनवली होती. त्यांच्यावर झुंड हा चित्रपट बनला आहे. यात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन आहेत. या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. पोस्ट प्रॉडक्शनही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. खरंतर हा चित्रपट 8 मेला प्रदर्शित होणार होता. पण सगळं सुरळीत चालू असतानाच लॉकडाऊन आला.
लॉकडाऊन आल्यानंतर सर्वच चित्रपटांचं काम थांबलं. पोस्ट प्रॉडक्शन काही प्रमाणात सोशल डिस्टन्स ठेवून चालू होतं पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी. नागराज मंजुळेही झुंडच्या कामात व्यग्र होता. आता लॉकडाऊनमुळे बहुतांश तयार सिनेमा थांबवण्याची वेळ आली. झुंडच्या आधी बहुचर्चित सूर्यवंशी आणि 83 प्रदर्शित होणार होते. पण त्यांचं प्रदर्शनही लांबलं. साहजिकच पुढे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर त्याचा परिणाम झाला आहे. म्हणून आता लॉकडाऊन उठणार कधी? थिएटर्स उघडणार कधी? यावर बाकीच्या सिनेमांचं भवितव्य अवलंबून आहे. अशामध्ये लार्जर दॅन लाईफ भासणारे चित्रपट थिएटर्समध्येच रिलीज करण्याकडे वितरकांचा कल आहे. म्हणूनच सूर्यवंशी हा ओटीटीवर येणारा नसून तो थिएटरमध्येच येईल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. तशात झुंड हा चित्रपट एमेझॉन प्राईमने घेऊन तो ऑनलाईन रिलीज होत असल्याच्या बातम्या आल्याने खळबळ उडाली आहे.
एक महत्वाची गोष्ट अशी की या बातम्यांना कोणताही ठोस आधार मिळालेला नाही. झुंडचे हक्क अमेझॉन प्राईमने घेतल्याच्या बातम्या येत आहेत. पण अद्याप खुद्द एमेझॉन प्राईमने याला दुजोरा दिलेला नाही. शिवाय टी सीरीजनेही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. नागराजच्या गोटातूनही कोणी यावर बोलायला तयार नाही. ओटीटीबाबत चर्चा सुरू असून याबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही असं समजतं. खरंतर चित्रपटाची एकूण बांधणी.. आणि नागराज मंजुळे याचं दिग्दर्शन पाहता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यातच मजा आहे हे कोणीही सांगेल. कोणताही अधिकृत दुजोरा नसताना अशा बातम्या येणं दुर्दैवी असल्याचं नागराजचे निकटवर्तीय सांगतात.
झुंडचे हक्क कोणीही ओटीटीवाले घेऊ शकतात. पण त्यात नियम अटी काय आहेत हे पाहावं लागेल. केवळ सिनेमा घेणं आणि तो रिलीज करणं यात मोठा फरक आहे असंही बोललं जातं. काहींच्या मते झुंड हा स्मॉल बजेट मुव्ही आहे. यात अमिताभ बच्चन सोडले तर दुसरा मोठा चेहरा नाही. मग टी सीरीजसारखी व्यावसायिक कंपनी याचे हक्क विकून नफ्यात राहण्याचा विचार करू शकते. कारण, मुंबई आणि महराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळे लॉकडाऊन लवकर उठण्याची शक्यता नाही. अशात थिएटर्स कधी खुली होणार हे सांगणंही अवघड आहे. थिएटर्स उघडली गेल्यानंतर लोक थिएटरमध्ये कधी येतील हे सांगणंही कठीण आहे. अशात आधीचे मोठे सिनेमे आहेतच. त्यानंतर इतर सिनेमांचा नंबर लागणार आहे. त्याला पुढचं वर्षंही उजाडेल. मग उतकं थांबण्यापेक्षा चित्रपट ओटीटीवर रिलीज केलेला काय वाईट असं टी-सीरीजच्या गोटात चर्चा सुरू असल्याचं कळतं.
अर्थात ही सगळी मतमतांतरं आहेत. झुंड आणि लुडो हे दोन सिनेमे ओटीटीने घेतल्याचं बोललं जात असलं तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा कुणीही दिलेला नाही. त्यामुळे सध्या या केवळ अफवाच आहेत असं मानायला हरकत नाही. जेव्हा केव्हा अधिकृत स्टेटमेंट येईल तेव्हा कळेलच सर्वांना.
ओटीटी म्हणजे काय?
ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप सर्व्हिस. आजतागायत आपण सगळे कार्यक्रम केबल किंवा डिश टीव्ही द्वारे पाहातो. तर ओटीटी म्हणजे थेट इंटरनेट किंवा हायस्पीड डेटा केबल द्वारे प्रेक्षक थेट कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतात. कोणत्याही इतर उपकरणाशिवाय केवळ इंटरनेट द्वारे थेट प्रेक्षकांपर्यंत पोचणारा प्लॅटफॉर्म म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. नेटफ्लिक्स, एमेझॉन प्राईम,, हॉटस्टार, य़ू ट्युब हे ओटीटी प्लॅटफॉर्म गणले जातात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement