Virat Anushka welcoming Baby Girl : विराट-अनुष्काला 'कन्यारत्न', विराटकडून चाहत्यांना खास विनंती
कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ही गोड बातमी देताना विराटने चाहत्यांकडे खास विनंती देखील केली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना दिली आहे. ही गोड बातमी देताना विराटने चाहत्यांकडे खास विनंती देखील केली आहे. आम्हाला एकमेकांसोबत राहण्याची जास्त गरज असून आम्हाला थोड्या प्रायव्हसीची गरज आहे, अशी विनंती विराटने चाहत्यांकडे केली आहे.
विराटनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की, आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आला. आता आम्हाला या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे, हे तुम्ही नक्की समजू शकता असं विराटनं म्हटलं आहे.
या अगोदर अनुष्का शर्मा ही एका कृत्यावर नाराजी झाली होती. पती विराट कोहलीसोबत वेळ घालवत असताना अनुष्का आणि विराटचा फोटो पॅपाराजीने कॅमेऱ्यात कैद केला. त्यावरुन अनुष्काने फोटोग्राफरला खडे बोल सुनावले होते. याप्रकरणी नाराजी व्यक्त करत अनुष्का शर्माने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत फोटोग्राफरला खडे बोल सुनावले होते.. तिने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, 'फोटोग्राफर आणि पब्लिकेशन्सला अनेकदा विनंती केल्यानंतरही त्यांनी आमच्या प्रायव्हसीमध्ये दखल देणं सुरुच ठेवलं आहे. हे सर्व आताच थांबवा.'
यापूर्वी जया बच्चन यांचा देखील एक व्हिडीओ चांगला व्हायरल झाला होता. गर्दीच्या ठिकाणी त्यांचे फोटो काढणाऱ्या किंवा सेल्फीसाठी धडपडणाऱ्या चाहत्यांना जया बच्चन यांनी यापूर्वीदेखील अनेकदा खडसावले आहे.
संबंधित बातम्या :