(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anushka Sharma | "...तरीही आमच्या प्रायव्हसीमध्ये डोकावलंच" ; फोटोग्राफरवर अनुष्का शर्मा संतापली
पती विराटसह खाजगी फोटो क्लिक केल्यामुळे फोटोग्राफरवर अनुष्का शर्मा संतापली असून तिने फोटोग्राफरला खडे बोल सुनावले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सोशल मीडियावर आपल्या कठोर कमेंट्ससाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा अनुष्का शर्माने पॅपाराजीच्या एका कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पती विराट कोहलीसोबत वेळ घालवत असताना अनुष्का आणि विराटचा फोटो पॅपाराजीने कॅमेऱ्यात कैद केला. त्यावरुन अनुष्काने फोटोग्राफरला खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, विराट आणि अनुष्का आपल्या घराच्या लॉबीमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत होते. अशातच फोटोग्राफरने त्यादोघांना स्पॉट करत एक फोटो क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या याच कृत्यावर अनुष्काने नाराजी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी नाराजी व्यक्त करत अनुष्का शर्माने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत फोटोग्राफरला खडे बोल सुनावले आहेत. तिने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, 'फोटोग्राफर आणि पब्लिकेशन्सला अनेकदा विनंती केल्यानंतरही त्यांनी आमच्या प्रायव्हसीमध्ये दखल देणं सुरुच ठेवलं आहे. हे सर्व आताच थांबवा.'
दरम्यान, लवकरच अनुष्का आणि विराटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अशातच सध्या अनुष्का आणि विराट अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. तसेच विराट अनुष्काची काळजी घेतानाही दिसत आहे. अनुष्का आपल्या गरोदरपणात योगा आणि वर्कआउट करताना देखील दिसून येत आहे.
View this post on Instagram
फोटोग्राफरने केलेल्या पोस्टमध्ये अनुष्का आणि विराट एका ठिकाणी बसले असून ते एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करत आहेत. दरम्यान, अनुष्का शर्माची डिलीवरी डेट याच महिन्यात आहे. अशातच ती आधीपेक्षा जास्त आपली काळजी घेताना दिसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक व्हिडीओ पोस्ट करत अनुष्काने आपल्या गरोदर असल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.
अनुष्काने गरोदरपणातही आपली फिगर आणि वजन मेंटेन केलं आहे. अनुष्का बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली, पण तिच्या फिगरवर मात्र फारसा फरक पडलेला दिसला नाही. याचं कारण म्हणजे, अनुष्काचं वर्कआउट रुटीन. अनुष्का गरोदरपणातही योगा आणि वर्कआउट करताना दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या :
Anushka Sharma | अनुष्काचं वर्कआउट रुटीन; गरोदरपणातही फिट अन् मेन्टेन