एक्स्प्लोर
Advertisement
काही जातीयवाद्यांनी सिनेक्षेत्रात जातीयवाद निर्माण केला : विक्रम गोखले
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी ब्राह्मण कलाकारांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सोशल माध्यमांवर त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ पोस्ट येत आहेत.
मुंबई : सिनेक्षेत्रात जातीयवादी लोकांनी जातीयवाद निर्माण केला आहे. मात्र माझ्याबाबतीत मात्र असं घडलेलं नाही, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे. सुजय डहाके यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सुजय डहाके यांनी असं वक्तव्य केलं असं मी ऐकलेलं नाही. सुजय माझा चांगला तरुण मित्र आहे. मी त्याला याबाबत विचारेल, असंही ते म्हणाले.
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ब्राह्मण कलाकारांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सोशल माध्यमांवर त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ पोस्ट येत आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीत एकच चर्चा रंगली आहे. याबाबत अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. तर ब्राह्मण महासंघानेदेखील सुजय डहाकेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
सध्याच्या बेलगाम भाजप नेत्यांनी तोंडावर जरा लगाम घालावा : अभिनेते विक्रम गोखले
याविषयी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना विचारले असता ते म्हणाले की, ही खरंच चिंतेची बाब आहे. मात्र, आपण काहीच करु शकत नाही, असं विक्रम गोखले म्हणाले.
राज ठाकरेंची भाषणं मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या : विक्रम गोखले
ते म्हणाले की, सिनेसृष्टीमध्ये मी कधीही जातीयवाद अनुभवला नाही. किंबहुना माझ्या सहकाऱ्यांसोबत देखील जातीयवाद झाल्याचं माझ्या लक्षात नाही. विक्रम गोखले लवकरच ते 'एबी आणि सीडी' या चित्रपटात आगळ्यावेगळ्या रुपात येणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत ते दिसणार आहेत.
काय आहे नेमका वाद
सगळ्या मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रीचं मुख्य भूमिकेत का आहेत? असा प्रश्न सुजय डहाके यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विचारला होता. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला. सुजय डहाकेंनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता शशांक केतकर, सौरभ गोखले यांच्यासह अनेकांनी टीका केली. तसेच ब्राह्मण महासंघानेदेखील सुजय डहाकेंच्या वक्तव्याचा निषेध केला. सुजय डहाकेंनी ब्राह्मण कलाकारांबद्दल जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निव्वळ मूर्खपणाचं हे विधान आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचे हे उद्योग आहेत. प्रसिद्धीसाठी सुजय डहाकेने हे विधान केलेलं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं असं देखील ब्राह्मण महासंघाने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement