Upasana Singh : पैशांसाठी नाही तर 'या' कारणामुळे उपासना सिंहनं सोडला होता कपिल शर्मा शो; अभिनेत्रीनं सांगितलं कारण
एका मुलाखतीमध्ये उपासनानं (Upasana Singh) द कपिल शर्मा शो सोडण्याचं कारण सांगितलं.
Upasana Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उपासना सिंहनं (Upasana Singh) छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील काम केले. आपल्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं उपासनानं अनेकांची मनं जिंकली. कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मधून देखील उपासना प्रेक्षकांच्या भेटीस आली. द कपिल शर्मा शोमध्ये उपासनानं पिंकी बुवा ही भूमिका साकारली. उपासनाच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पण 2017 मध्ये उपासनानं द कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये उपासनानं द कपिल शर्मा शो सोडण्याचं कारण सांगितलं.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये उपासना सिंहनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच करिअरबाबत सांगितलं. मुलाखतीमध्ये द कपिल शर्मा शोबाबत उपासनानं सांगितलं, 'पैसे हे महत्त्वाचे असतात. पण काम केल्यानंतर वाटणारे समाधान अधिक महत्त्वाचे होते. मी फक्त त्याच भूमिका साकारते ज्या केल्यानंतर मला चांगलं वाटेल. मी नेहमी निर्मात्यांना सांगते की मला अशाच भूमिका साकारण्याची संधी द्या जी इतर कोणी साकारु शकणार नाही. मी कपिल शर्मा शो करत होते तेव्हा तो शो टॉप होता. काही दिवसानंतर मला जाणवलं की, या शोमध्ये करण्यासारखं काहीच नाहीये. मला ती भूमिका साकारताना मजा येत नव्हती. त्यामुळे मी तो शो सोडला. मला त्या शोमध्ये योग्य मानधन मिळत होते कारण तो शो हिट होता. पण मला शोमध्ये काम करताना मजा येत नव्हती. '
View this post on Instagram
'राजा की आयेगी बारात', 'बनी-इश्क दा कलमा', 'मायका', 'सोनपरी' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये उपासनानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. उपासना सिंहने 2009मध्ये टीव्ही मालिका 'साथ निभाना साथिया'चा सहकारी अभिनेता नीरज भारद्वाज याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.
हेही वाचा: