Pawankhind: ‘पावनखिंड’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित, ‘युगत मांडली’ गाण्याला मिळतोय भरघोस प्रतिसाद
Pawankhind: पावनखिंड हा चित्रपट 10 जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळं या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलीय.
Pawankhind: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील अनेक शौर्यगाथा आपल्याला माहिती आहेत. या शौर्यगाथांपैकी एक ‘पावनखिंड’चा थरार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘पावनखिंड’ हा ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. पावनखिंड थरार अनुभवण्यासाठी प्रत्येकजण उस्तुक आहे. याच दरम्यान, या चित्रपटातील पहिलं गाणं युगत मांडली प्रदर्शित झालंय. या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळतोय.
पावनखिंड हा चित्रपट 10 जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळं या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलीय. दरम्यान, 13 जुलै रोजील नरवीर बाजीप्रभू यांच्या या पावनखिंड लढतीला 361 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. यातच आज या चित्रपटाचं पहिलं गाणं युगत मांडली प्रदर्शित झालंय. या गाण्याला अनेकांनी पसंती दर्शवलीय. 31 डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा पावनखिंड सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'पावनखिंड' चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
सिनेमात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तसेच मराठी कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं 'पावनखिंड' नाव पडलं. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमाचा अनुभव घेता येणार आहे.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Amitabh Bacchan : 'बिग बी'च्या घरी भाड्यानं राहणार 'ही' अभिनेत्री, घराचं भाडं महिना 10 लाख!
- Miss Universe Harnaaz Sandhu : 21 वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली...
- Miss universe 2021 : भारताची हरनाज संधू बनली विश्वसुंदरी, पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब