Vanita Kharat: 'थोडी स्वस्त कॉफी...'; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची पोस्ट चर्चेत
नुकतीच वनितानं (vanita kharat) एक खास पोस्ट शेअर केली. वनिताच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं.
Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या प्रसिद्ध कार्यक्रामाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम आवडीनं बघतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठा आहे. या कार्यक्रमातील अभिनेत्री वनिता खरात (vanita kharat) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच वनितानं एक खास पोस्ट शेअर केली. वनिताच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं.
वनितानं एका कपचा फोटो शेअर केला. हा फोटोचा कपचा शेअर करुन कॅप्शनमध्ये वनितानं लिहिलं, 'हे स्टारबक्स, थोडी स्वस्त कॉफी द्या'. वनिता ही तिच्या मित्र मैत्रीणींसोबत कॉफी प्यायला गेली होती.
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनं देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये प्रियदर्शिनी, वनिता आणि शिवाली परब हे एका कॅफेमध्ये मजा मस्ती करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील वनितानं विशेष ओळख निर्माण केली आहे. 'कबीर सिंह' या हिंदी चित्रपटात वनितानं काम केलं. तसेच वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: