Maharashtrachi Hasyajatra : 'जादूचा व्हिडीओ'; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील वनिता खरातचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) एका खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन प्रसादनं अभिनेत्री वनिता खरातला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या प्रसिद्ध कार्यक्रामाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम आवडीनं बघतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठा आहे. कार्यक्रमातील कलाकार सेटवरील मज्जा, मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच अभिनेता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) एका खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन प्रसादनं खास पद्धतीनं अभिनेत्री वनिता खरातला (vanita kharat) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रसादची खास पोस्ट
काल (19 जुलै) वनिता खरातचा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं प्रसादनं एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओला प्रसादनं खास कॅप्शन देखील दिलं आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रसादनं लिहिलं, "जादू चा व्हिडीओ हा व्हिडीओ ऑन केला की तुम्ही 2 काऊंट मोजा आणि 'वने sssssss' अशी जोरात हाक मारा. मग जादू होईल वनी तुमच्याकडे बघेल मग तिला बर्थडे विश करा. आज आमच्या वनीचा, बबड्याचा बड्डे आहे. हॅप्पी बर्थ-डे वनी. आमच्या सेट वरील सगळ्यांची लाडकी, सगळ्यांकडे हक्काने हट्ट करून स्वतःचे लाड पूरवून घेणारी वनी . वने तुला आयुष्यात जे जे हवं ते ते सगळं तुला मिळो आणि आता आहेस तशीच हसत ,खेळत आणि बागडत राहा. बाकी दाद आहेच लव्ह यू वन ' वनिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स करुन विनीताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत.
हेही वाचा:
- Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामधील दत्तू मोरेच्या राहत्या चाळीचं नाव 'दत्तू चाळ'; पोस्ट शेअर करत म्हणाला,'माझ्यावर चाळीतल्या लोकांचं प्रेम '
- Nikhil Bane : जुन्या जागेत एक आत्मा राहतो... चाळीतल्या दहा बाय दहाच्या घराबद्दल काय म्हणाला 'हास्यजत्रा फेम' निखिल बने....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
