एक्स्प्लोर

Lokmanya : महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना! टिळकांचा असामान्य प्रवास आता मालिकारुपात; लोकमान्यांच्या भूमिकेत क्षितीज दाते

Lokmanya : लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान आता मालिकारूपात पाहायला मिळणार आहे. 'लोकमान्य' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Lokmanya : मुंबई-पुण्यातील काही भागांत 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आले. या पोस्टरमुळे अनेक चर्चांना उधाण आलं. पण ते होर्डींग कोणी लावले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. अखेर हे पोस्टर 'लोकमान्य' मालिकेच्या प्रमोशनसाठीचे असल्याचा उलगडा झाला आहे. 

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान शाळकरी वयात असल्यापासून आपल्या अंगी भिनलेला आहे. लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास आपल्याला तोंडपाठ आहे. टिळकांचं राष्ट्रप्रेम, त्यांचं करारी व्यक्तिमत्त्व आपल्या प्रत्येकाच्या मनात वसलेलं आहे. त्यामुळे आजही लोकमान्य असा शब्द जरी उच्चारला तरी टिळकांचा प्रभावी इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांच्या प्रभावी कृतीतून त्यांनी घालून दिलेला एकत्र येण्याचा वसा आपण आजही जपतो आहोत.

लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहे. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा 'लोकमान्य' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

लोकमान्य टिळक जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते. घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. 

'लोकमान्य' या मालिकेचं लेखन आशुतोष परांडकरने केलं आहे. तर मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा स्वप्निल वारके सांभाळणार आहे. या मालिकेत अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ही मालिका 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

लोकमान्य
कधीपासून होणार सुरू ? 21 डिसेंबर
कुठे पाहू शकता? बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वा. 

संबंधित बातम्या

Akshaya Naik : "माझी नावडती व्यक्ती"; लतिकाकडून अभ्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पोस्टनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: बदलापूर-खोपोली वाहतूक बंद, मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळापत्रकात नेमके काय बदल होणार?
Horoscope Today 10 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Torres Scam : टोरेसच्या ऑफिसमध्ये पहाटे घडामोडी, 'त्या' दोघींकडून बॅगेत पैसे भरुन पसार होण्याचं प्लॅनिंग, एका फोननं प्रदीपकुमार सतर्क अन् खेळ खल्लास
टोरेसच्या कार्यालयातून टीप मिळाली, प्रदीपकुमार सहकाऱ्यांसह दादरच्या ऑफिसमध्ये पोहोचला अन् घोटाळ्याचा भांडाफोड
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP MajhaTop 100 Headlines :  टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 Jan 2025 : ABP MajhaSoybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special ReportFatima Shaikh Savitribai Phule : सावित्रीबाईंची सखी सत्य की कल्पित? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: बदलापूर-खोपोली वाहतूक बंद, मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळापत्रकात नेमके काय बदल होणार?
Horoscope Today 10 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Torres Scam : टोरेसच्या ऑफिसमध्ये पहाटे घडामोडी, 'त्या' दोघींकडून बॅगेत पैसे भरुन पसार होण्याचं प्लॅनिंग, एका फोननं प्रदीपकुमार सतर्क अन् खेळ खल्लास
टोरेसच्या कार्यालयातून टीप मिळाली, प्रदीपकुमार सहकाऱ्यांसह दादरच्या ऑफिसमध्ये पोहोचला अन् घोटाळ्याचा भांडाफोड
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Mutual Fund SIP : शेअर बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदारांनी म्युच्यूअल फंडावर विश्वास दाखवला, डिसेंबरमध्ये 26000 कोटींची गुंतवणूक
बाजार अस्थिर असताना देखील गुंतवणूकदार खंबीर, SIP वर विश्वास, डिसेंबरमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक, आकडेवारी समोर
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Embed widget