Akshaya Naik : "माझी नावडती व्यक्ती"; लतिकाकडून अभ्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पोस्टनं वेधलं लक्ष
Akshaya Naik : 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील अभ्याचा आज वाढदिवस असून लतिकाने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Akshaya Naik : 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अक्षया नाईक (Akshaya Naik) आणि समीर परांजपे (Sameer Paranjapee) मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची लतिका-अभिमन्यूची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. आज समीरच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाने हटके पोस्ट लिहिली आहे.
अक्षयाने लिहिलं आहे,"माझी सर्वात लाडकी नावडती व्यक्ती…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला तोंडावर महत्त्व द्यायला मला आवडत नाही. पण माझ्यासाठी तू खूप महत्त्वाचा आहेस. तू जितका माझा अपमान करतोस तितका मी तर कोणालाही करू देत नाही"
अक्षयाने पुढे लिहिले आहे,"ते कौशल्य तुझ्याइतकं दुसरं कोणाला जमत नाही. माझा ग्लास आणि माझा हिरो कधीच विसरणार नाही. वाढदिवसाचं गिफ्ट पोहोचलं आहे, पार्टीची वसुली लवकरच करेन". लतिकाच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्ट शेअर करत तिने अभ्यासोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत".
View this post on Instagram
अक्षयच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट करत समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लतिका आणि अभ्याच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तर समीरने कमेंट केली आहे,"हाहाहा...टुडे...खूप प्रेम...भेट लवकर...पार्टी तो बनती है...लय गोड लिहिलं आहेस टुडे".
'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेच्या माध्यमातून समीरने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर 'गोठ', 'गर्जा महाराष्ट्र' आणि 'अग्निहोत्र 2' या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. 'भातुकली' या सिनेमादेखील तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या 'क्लास ऑफ 83'मधून दिसलेला समीर आता 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत एका वेगळ्या नायकाच्या भूमिकेत दिसला.
संबंधित बातम्या