Tejasswi Prakash : लॉक अपमध्ये ‘वॉर्डन’ बनण्यासाठी तेजस्वी प्रकाशने घेतलं ‘इतकं’ मानधन! करण कुंद्रासोबत ‘जेल’मध्ये होणार धमाल!
Tejasswi Prakash : कंगना रनौतच्या या शोमध्ये करण कुंद्रा जेलर बनला आहे. आता तेजस्वी त्यात 'क्वीन्स वॉर्डन' म्हणून सामील झाली आहे.
Tejasswi Prakash : टीव्हीची दिवा आणि ‘बिग बॉस 15’ची (Bigg Boss 15) विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) सध्या चालू असलेला रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये (Lock Upp) फिनालेच्या अगोदर 'वॉर्डन' म्हणून सामील झाली आहे. कंगना रनौतच्या या शोमध्ये करण कुंद्रा जेलर बनला आहे. आता तेजस्वी त्यात 'क्वीन्स वॉर्डन' म्हणून सामील झाली आहे, जिच्याकडे 'क्वीन कार्ड' नावाचा विशेष अधिकार आहे. या शोसाठी तेजस्वीला बक्कळ मानधन देण्यात आलं आहे.
ALTBalaji ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर तेजस्वी या शोमध्ये झळकणार असल्याची घोषणा केली होती. ‘लॉक अप’ हा एक वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे, जो Alt Balaji आणि MX Player वर प्रसारित होतो.
तेजस्वीला मिळाले ‘इतके’ मानधन!
आता तेजस्वी प्रकाशची या शोमध्ये दमदार एन्ट्री झाली आहे. या जेलची वॉर्डन होण्यासाठी तिने तगडं मानधन आकारलं आहे. रिपोर्ट्सनुसार, तेजस्वीने एका एपिसोडसाठी 2 ते 3 लाख रुपये रुपये मानधन म्हणून घेतले आहेत. तर, अभिनेता करण कुंद्रालाही तेवढीच फी मिळत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तेजस्वी आणि करण ही जोडी ग्रँड फिनालेची शान वाढवणार आहे. 7 मे रोजी रात्री 10.30 वाजता हा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
करण कुंद्रा बनलाय जेलर
करण कुंद्राने मार्चमध्ये जेलरच्या भूमिकेत या शोमध्ये प्रवेश केला होता. या शोमध्ये तो स्पर्धकांना अनेक टास्क करायला लावतो आणि त्यांच्याकडून आणखी काही चूक झाली, तर स्पर्धकाची चांगली शाळाही घेतो. करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत.
‘लॉक अप’ हा कैद्यांवर आधारित शो आहे. या शोमध्ये कंगनाच्या तुरुंगात सेलिब्रिटी स्पर्धक लॉक झालेले दिसत आहेत. या कारागृहात कैद्यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी कामे करावी लागत होती. शोचा ग्रँड फिनाले या शनिवारी म्हणजेच 7 मे रोजी होणार आहे आणि यासोबतच शोचा पहिला सीझनही संपणार आहे.
हेही वाचा :