Happy Birthday Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...
Ashwini Bhave Birthday : आजही जेव्हा ‘लिंबू कलरची साडी’ म्हटले जाते तेव्हा, अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांचा चेहरा लगेच डोळ्यांसमोर येतो.
Ashwini Bhave Birthday : मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे ‘अशीही बनवाबनवी’. यां चित्रपटाने रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं. आजही या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये आणि रसिक प्रेक्षकांमध्ये आहे. ‘अशीही बनवाबनवी’ चित्रपटात असे अनेक संवाद होते, जे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. यापैकीच एक होता ‘लिंबू कलरची साडी’. आजही जेव्हा ‘लिंबू कलरची साडी’ म्हटले जाते तेव्हा, अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांचा चेहरा लगेच डोळ्यांसमोर येतो. अभिनेत्री अश्विनी भावे आज (7 मे) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.
90च्या दशकांत अश्विनी भावे यांनी आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले होते. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्या सक्रिय होत्या. आजघडीला जरी त्या मनोरंजन विश्वापासून दूर असल्या, तरी त्यांची गणना मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते.
कॉलेजमधून नाटकांत सहभाग
अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1972 रोजी मुंबईत झाला. मुंबईतील साधना विद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. मुंबई मधील रुपारेल कॉलेज मधून त्यांनी आपली फिलॉसॉफीची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथून फिल्म संबंधित विषयात पदविका मिळवली. कॉलेजदरम्यानच त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्या छोट्या पडद्याकडे वळाल्या. ‘अंतरिक्ष’ नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
हिंदीतही गाजवले नाव!
‘युगपुरुष’ मालिकेनंतर त्यांच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. ‘शाबास सुनबाई’ या चित्रपटामधून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी ‘अशीही बनवाबनवी’ या चित्रपटात भूमिका केली. या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे हिंदीतूनही ऑफर येऊ लागल्या. ‘हिना’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर भरपूर कमाई केली. ‘हिना’ हा चित्रपट त्याकाळच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील ‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते, जे आजही रसिकांना मंत्रमुग्ध करते.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न करून त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. यानंतर त्यांनी मनोरंजन विश्वातून काढता पाय घेतला आणि संसार-मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देऊ लागल्या.
महत्वाच्या बातम्या :