एक्स्प्लोर
शिल्पानंतर आता मराठमोळी अभिनेत्रीच साकारणार अंगुरी भाभी!
मुंबई : मोठ्या वादानंतर 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून बाहेर पडलेल्या शिल्पा शिंदेची जागा एक मराठमोळी अभिनेत्रीच घेणार आहे. अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी शुभांगी अत्रेची निवड करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून शिल्पा शिंदे आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये वाद सुरु आहे. शिल्पाने अचानक मालिका सोडली. त्यानंतर सिन्टा शिल्पावर आजीवर बंदी घालणार असल्याची चर्चा होती.
शिल्पाने मालिका सोडल्यानंतर निर्माते नव्या अंगुरी भाभीचा शोध घेत होते. या भूमिकेसाठी रश्मी देसाई तसंच शीतल खंडाल यांची नावं समोर आली होती. मात्र आता शुभांगी अत्रेच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे 'सही पकडे है...' असं म्हणत शुभांगी अंगुरी भाभीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शुभांगीने चिडीया घर, कसौटी जिंदगी की, कस्तुरी, दो हंसो का जोडा, अधुरी कहानी हमारी यांसारख्या मालिकांमधून अभिनय केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे मालिकेत शिल्पाला रिप्लेस करण्याची शुभांगीची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 'चिडीया घर' या मालिकेत शिल्पा साकारत असलेली कोयलची भूमिका नंतर शुभांगीला मिळाली होती.
संबंधित बातम्या
'माझ्यावर बंदी घालता येणार नाही', 'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचा दावा
शिल्पा शिंदेची आर्टिस्ट असोसिएशन विरोधात तक्रार
‘अंगुरी भाभी’ उर्फ शिल्पा शिंदेवर आजीवन बंदी?
‘भाभीजी घर पर हैं’ मधून भाभी घराबाहेर?
‘भाभी जी घर पर हैं’ च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस!
शिल्पाला ‘भाभी जी घर पर हैं’ सोडण्यासाठी कपिलने भडकावलं?
‘अंगुरी भाभी’ उर्फ शिल्पा शिंदेचं लग्न होता होता राहिलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement