एक्स्प्लोर
अंधाराचा विनाश करण्यासाठी लवकरच परतणार शक्तिमान !

मुंबई : छोट्या पडद्यावरील लहान-मोठ्यांचा सुपरहिरो शक्तिमान पुन्हा परतणार आहे. 'सत्य की रक्षा' करणारा शक्तिमानने 90 च्या दशकात बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावलं होतं. त्यामुळे शक्तिमान आणि गंगाधर आजही लहान-मोठ्यांच्या मनात घर करुन आहेत.
त्यामुळे 'शक्तिमान' मुकेश खन्ना पुन्हा एकदा आपलं पात्र जिवंत करु इच्छित आहेत.
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या मते, "मुकेश खन्ना शक्तिमान मालिका पुन्हा टीव्हीवर सुरु करु इच्छित आहेत. त्यासाठी त्यांची टीव्ही वाहिन्यांशी चर्चा सुरु आहे. शक्तिमान मालिका कधी सुरु होणार हे जरी त्यांनी सांगितलं नसलं, तरी मुकेश खन्ना यांची याबाबत तीव्र इच्छा आहे."
मुकेश खन्ना आपल्या लूक आणि बॉडीवर लक्ष देत आहेत. 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी त्यांनी 8 किलो वजन कमी केलं आहे. आणखी 8 किलो वजन कमी करणार आहेत. मुकेश खन्ना सिक्स पॅक अब्ज बनवू इच्छित नाहीत, मात्र 15 वर्षांपूर्वीसारखाच शक्तिमान त्यांना निभवायचा आहे. चाहत्यांनी नेहमी शक्तिमान म्हणूनच ओळखलं, त्यामुळे त्याच रुपात चाहत्यांसमोर जाण्याची इच्छा मुकेश खन्ना यांची आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
