Bigg Boss 15: 'जर मी अभिनेता नसतो तर...'; बिग बॉसच्या मंचावर करिअरबाबत सलमान खानचा खुलासा
सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो.
![Bigg Boss 15: 'जर मी अभिनेता नसतो तर...'; बिग बॉसच्या मंचावर करिअरबाबत सलमान खानचा खुलासा salman khan revealed in bigg boss 15 stage abou his Profession Bigg Boss 15: 'जर मी अभिनेता नसतो तर...'; बिग बॉसच्या मंचावर करिअरबाबत सलमान खानचा खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/24/05319c2c7b0a39a761e02bffa95b6120_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Salman Khan Show Bigg Boss 15 New Promo : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. गेली अनेक वर्ष सलमान 'बिग बॉस' या शोचे सुत्रसंचालन करत आहे. सध्या बिग बॉस शोचा 15 वा (Bigg Boss 15) सिझन सुरू आहे. या सिझनच्या एका एपिसोडमध्ये सलमानने त्याच्या करिअरबाबत सांगितले आहे.
सलमान बिग बॉस शोमध्ये स्पर्धकांसोबत मस्ती करताना आणि आलेल्या गेस्टसोबत गप्पा मारताना दिसतो. नुकतीच अभिनेता कार्तिक आर्यनने या शोमध्ये हजेरी लावली. कार्तिक त्याच्या धमका या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस-15 या शोमध्ये आला होता. या वेळी तो सलमानसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी सलमानने कार्तिकला प्रश्न विचारला की,'मी अभिनेता नसतो तर मी कोणते काम केले असते.' यावर कार्तिकने उत्तर दिले, 'सर तुम्ही अॅक्टर नसता, तर आमचे काय झाले असते.' 'मी जर अभिनेता नसतो तर मी दिग्दर्शक झालो असतो' असं सलमानने सांगितलं.
View this post on Instagram
कार्तिकने बिग बॉसच्या या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कार्तिकच्या धमाका या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. कार्तिकचे अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कियारा आडवाणी सोबतचा 'भूल भूलैया', 'सत्यनारायण की कथा', 'फ्रेडी' आणि 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटांमध्ये कार्तिक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याला करण जौहरच्या 'दोस्ताना 2' मधून काढून टाकले होते, अशी चर्चा होती. त्या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या जागी आता खिलाडी अक्षय कुमार दिसणार असं म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)