एक्स्प्लोर
कपिलच्या शोमधून सिद्धू किती कमावतो?
मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' हा टेलिव्हिजन क्षेत्रातील एक नामांकित शो आहे. या शोमध्ये माजी क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धूही तुफान विनोद, शेरोशायरी करताना दिसतो. मात्र याच शो साठी सिद्धूला किती रक्कम मिळते?
नवज्योतसिंह सिद्धूकडे जवळपास 45.91 कोटींची संपत्ती आहे. त्याच्याकडे 44 लाखाचं घड्याळ, दोन लँड क्रूजर, एक मिनी कूपर कार आणि 15 लाखाचे दागिने आहेत.
सिद्धूला कपिलच्या शोसाठी मिळणारी रक्कमही तुम्हा-आम्हाला अवाक् करायला लावणारी आहे. एका वेबसाईटनुसार कपिलच्या शोद्वारे सिद्धूला वर्षाला 25 कोटी रुपये मिळतात.
काँग्रेसकडून निवडणूक लढवलेला सिद्धू सध्या पंजाबमध्ये मंत्री आहे. मात्र मंत्रिपदावर असूनही या शोमध्ये हजेरी लावण्यावरुन वाद निर्माण झाला होता.
मात्र या वादावर सिद्धूने त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं होतं. जर मला काही अडचण नाही तर तुम्हाला का? मला या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी पंजाबमधून तीन वाजता निघेन आणि पहाटे कोणी उठायच्या आत पंजाबमध्ये परत येईन, असं सिद्धू म्हणाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement