![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gaurav More : 'फिल्टर पाड्याच्या बच्चन'ची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून एक्झिट; गौरव मोरेची भावूक पोस्ट...
Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेता गौरव मोरेने एक्झिट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून गौरव मोरे या शोमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती.
![Gaurav More : 'फिल्टर पाड्याच्या बच्चन'ची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून एक्झिट; गौरव मोरेची भावूक पोस्ट... Gaurav More Actor take exit from Maharashtrachi Hasyajatra marathi comedy show post goes viral Gaurav More : 'फिल्टर पाड्याच्या बच्चन'ची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून एक्झिट; गौरव मोरेची भावूक पोस्ट...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/2a3f2f1a81461f2fe333b5bd7dbaa2ac1715154596484290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारा कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेता गौरव मोरेने (Gaurav More) एक्झिट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून गौरव मोरे या शोमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. अखेर आज गौरव मोरेने सोशल मीडियात पोस्ट लिहीत आपल्या निर्णयाची माहिती दिली. गौरव मोरेने हा शो सोडल्याची माहिती दिल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये गौरव मोरेने आपल्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. फिल्टर पाड्याचा बच्चन असणाऱ्या गौरव मोरेने आपल्या धमाल परफॉर्मेन्सने शोमध्ये धुमाकूळ घातला होता. आता, गौरवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सेटचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि यामध्ये त्याने आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडले असल्याचे सांगितले.
गौरव मोरेची पोस्ट काय?
गौरव मोरेने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटले की, “नमस्कार, पवई फिल्टरपाड्यातून मी गौरव मोरे. तानानानाना. आरा बाप मारतो का काय मी…ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं. सन्मान दिला. त्याबद्दल मी व माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो”.
View this post on Instagram
गौरवने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे.
गौरव मोरे आधी महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेने एक्झिट घेतली होती. गौरव मोरे सध्या सोनी वाहिनीवरील मॅडनेस मचायेंगे या शोमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याच्यासोबत हेमांगी कवी, कुशल बद्रिके हे मराठी कलाकार आहेत.
अखेर तो अंदाज खरा ठरला...
गौरव मोरेने मागील महिन्यात 'मॅडनेस मचाएंगे' मध्ये एन्ट्री घेतली होती. त्यामुळे गौरव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. चाहत्यांनी गौरवला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडू नका असाही सल्ला दिलेला. मात्र, आज गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडत असल्याचे जाहीर केले.
इतर महत्त्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)