Sarang Sathaye : 'नटसम्राट'पूर्वी 9 चित्रपट केलेत, पण ते रिलीजच झाले नाहीत; सारंग साठ्येने सांगितला सिनेसृष्टीतील अनुभव
Sarang Sathaye : नटसम्राट चित्रपटापासून सारंग साठ्ये हा प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र, नटसम्राटपूर्वी सारंगने 9 चित्रपटांमध्ये काम केले होते.
Sarang Sathaye : रुपेरी पडद्यावर झळकावे अशी इच्छा अनेकांची असते. मात्र, त्यातील फक्त काहीजणांचे स्वप्न पूर्ण होतात. मागील काही वर्षांपासून डिजीटल प्लॅटफॉर्मसोबत रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने मनं जिकंणारा अभिनेता, लेखक- निर्माता सारंग साठ्ये (Sarang Sathaye) 'नटसम्राट' चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र, नटसम्राटपूर्वी सारंगने 9 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यापैकी दोन चित्रपट हिंदी होते. हे 9 चित्रपट काही कारणांनी प्रदर्शित झाले नाही.
सारंग साठेने नटसम्राट, उंबटू या चित्रपटात भूमिका साकारली.त्याशिवाय, तो भाडिपासोबत स्टँडअप कॉमेडी शोदेखील करतो. सारंगची भूमिका असलेला 'नाच गं घुमा' हा चित्रपट सध्या तिकिटबारीवर प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. स्त्री केंद्रीत असणाऱ्या चित्रपटात सारंगनच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. सारंगने या चित्रपटाच्या निमित्ताने 'तारांगण'या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्या दरम्याने त्याने आपल्या 9 चित्रपट प्रदर्शित झाले नसल्याची माहिती दिली.
9 चित्रपटांनी थिएटर पाहिलाच नाही...
सारंग साठेने सांगितले की, माझे 9 सिनेमे रिलीज झाले नाही. नटसम्राट, उंबटूमुळे चित्रपटात काम करतो हे लोकांना समजले. पण, मी सुमित्रा भावेंसोबत 'मोर देखने जंगल मे' या चित्रपटात काम केले.पाश, नितळ, मराठी माणूस, म्हादू अशा चित्रपटात काम केले. त्याशिवाय 'दी ब्राईट डे' आणि विजय नांबियार यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केले. हे दोन्ही हिंदी सिनेमे रिलीज झाले नाही. आपण काम करतोय ते चित्रपट रिलीज होत नसल्याने माझा भम्रनिरास झाला आणि मी चित्रपटसृष्टीपासून दूर गेलो असल्याचे सारंगने सांगितले.
भारतातील पहिल्या वेब सीरिजमध्ये काम...
भारतामधील पहिली वेब सीरिज समजली जाणारी Bring On The Night या एम टीव्हीच्या इंग्रजी भाषेतील वेब सीरिजमध्ये काम केले. वेबसीरिज जगतामध्ये ही कल्ट सीरिज समजली जाते. मग मी टीव्हीएफसोबत काम केले. मग, भाडिपा आले. याच दरम्यान, नटसम्राट रिलीज झाला. मग, 'उंबटू' मधील गाणं हिट झाले. त्यानंतर पुन्हा आता चित्रपटातील कामासाठी विचारणा होऊ लागली असल्याचे त्याने सांगितले.
View this post on Instagram
वेबचा प्रभाव पण...
डिजीटल प्लॅटफॉर्मवर सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेब सीरिजही रिलीज होत आहेत. पण, सगळ्यात मोठी ताकद सिनेमाची असल्याचे सारंगने म्हटले. सिनेमा हा 'लार्जर दॅन लाईफ' दाखवतो. वेब प्लॅटफॉर्मचा प्रभाव आहे, तो लोकांपर्यंत पोहचतोय. पण, सिनेमा हेच माध्यम प्रभावी असल्याचे सारंगने म्हटले.