एक्स्प्लोर

FTII च्या अध्यक्षपदी 'सीआयडी'चे दिग्दर्शक बी.पी. सिंग

बिजेंद्र पाल एफटीआयआयचे माजी विद्यार्था आहेत. प्रसिद्ध टीव्ही सीरियल सीआयडीचे ते निर्माते आणि दिग्दर्शक होते.

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदी बिजेंद्र पाल सिंग यांची निवड करण्यात आली आहे. बी. पी. सिंग हे प्रसिद्ध टीव्ही मालिका सीआयडीचे निर्माते आणि दिग्दर्शक होते. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. बिजेंद्र पाल सिंग हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी (1970-73) असून त्यांनी छायाचित्रणात विशेष कौशल्य प्राप्त केलं होतं. तसेच सध्या ते एफटीआयआयच्या शासकीय परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवत होते. मार्च 2020 पर्यंत बी. पी. सिंग यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ असेल. विक्रमवीर दिग्दर्शक बी. पी. सिंग यांनी मनोरंजन विश्वाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ (21 वर्ष) चाललेल्या सीआयडी या विक्रमी टीव्ही मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. 2004 मध्ये बी. पी. सिंग यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं. 111 मिनिटांचा सलग शॉट (कुठेही कट किंवा रिटेक न घेता) चित्रित केल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री हर्षवर्धन राठोड यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. अनुपम खेर अध्यक्ष म्हणून फक्त तीन वेळा एफटीआयआयमध्ये आले होते, असं त्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांच्याशी पत्र व्यवहार केल्यास उत्तरं मिळायची नाहीत. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. ते सोडवले गेले नाहीत. त्यामुळे नवीन येणारे चेअरमन हे एफटीआयआयला भरपूर वेळ देणारे असावेत, अशी इच्छा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget