एक्स्प्लोर
Advertisement
'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'ची पहिल्याच दिवशी 1200 कोटींची कमाई, का आहे इतकी लोकप्रियता?
'अॅव्हेंजर्सः एण्डगेम' सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड्स ब्रेक करण्याच्या मार्गावर आहे. चित्रपट प्रदर्शित होताच याची कमाई 1200 कोटींपर्यंत पोहोचली. यातील 740 कोटींचा केवळ चायनाचा वाटा आहे.
मुंबई: 'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिस इवान्स, मार्क रुफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट योहान्सन आणि ब्री लारसन यांची प्रमुख भूमिका आहे. 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' हा मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा 22वा चित्रपट आहे. याआधी 'कॅप्टन मार्वेल' प्रदर्शित झाला होता. अमेरिकन कॉमिक बुक्सचे आणि मार्वेलचे लेखक स्टॅन ली यांनीदेखील मृत्यूपूर्वी एण्डगेममध्ये कॅमिओ केला आहे.
दहा लाख तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग
तिकीट विक्रीच्या बाबतीत 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुकमायशोच्या माहितीनुसार, एकाच दिवशी 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम'च्या 10 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली आहे. प्रति सेंकद 18 तिकीटं या वेगात विक्री झाली आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
सर्वात महागड्या तिकीटाची विक्री
अॅव्हेंजर्सचे चाहतेही या सिनेमाच्या तिकीटावर पैसे खर्च करत आहेत. आतापर्यंत या सिनेमाच्या सर्वात महागड्या तिकीटाची विक्री झाली आहे. तब्बल 2400 रुपयांना तिकीट विकलं गेलं आहे. दिल्लीतील एका थिएटरमध्ये या सिनेमाचं तिकीट सर्वात महागडं होतं. मुंबईत सर्वात महागडं तिकीट आयनॉक्सने विकलं होतं. या तिकीटाची किंमत होती 1765 रुपये. आतापर्यंत आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या तिकीटासाठी एवढात दर निश्चित करण्यात आला होता. पण ते देखील 1500 रुपयांना विकलं गेलं.
'अॅव्हेंजर्सः एण्डगेम' सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड्स ब्रेक करण्याच्या मार्गावर आहे. चित्रपट प्रदर्शित होताच याची कमाई 1200 कोटींपर्यंत पोहोचली. यातील केवळ चायनाचा वाटा आहे. एण्डगेमसाठी मोठं मार्केट ठरलेल्या चायनासोबतच साऊथ कोरियामध्ये 8.4 मिलियन डॉलर्स, ऑस्ट्रेलियामध्ये 7 मिलियन डॉलर्स, फ्रान्समध्ये 6 मिलियन डॉलर्स, इटलीत 5.8 मिलियन डॉलर्स, तर जर्मनीमध्ये 5.6 मिलियन डॉलर्स इतकी कमाई झाली.
अॅव्हेंजर्सची इतकी लोकप्रियता का?
सध्या चित्रपटांचे वेगवेगळे जॉनर सर्वांना आकर्षित करत आहेत. तरुणाईचा मोस्ट फेवरेट जॉनर सायन्स-फिक्शन असल्याचं दिसून येतं. मार्वेल आणि डी.सी.चे जवळजवळ सर्वच चित्रपट या प्रकारात मोडतात, तो सुपरमॅन असो वा थॉर. त्यामुळे सायन्स फिक्शनची ही गंमत पाहायला सध्याचा तरुणवर्ग आतुर असतो. आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अॅव्हेंजर्स चित्रपट 'अॅव्हेंजर्सः एण्डगेम' हाच ठरला आहे.
'अॅव्हेंजर्सः एण्डगेम' फक्त इन्फिनिटी वॉरचा सिक्वेल नसून तो आतापर्यंत मार्वेल सिनेमॅटिक युनिवर्सने रिलीज केलेल्या 21 चित्रपटांचा शेवटचा भाग आहे. हे सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. या सिरीजची सुरुवात 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या आयर्न मॅनपासून झाली आणि केव्हिन फेगेच्या मार्वेल स्टुडिओजने याला सर्वोत्कृष्ट म्हणून स्थापित केले. तब्बल 22 चित्रपटांचे एक अनोखे दशक पाहिल्यानंतर अॅव्हेंजर्स एण्डगेम पाहून मार्वेल फॅन्स हसतही आहेत आणि रडतही. जरी ही पात्र पुन्हा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसली तरी सर्व सुपरहिरोजने आपल्या कामगिरीने फॅन्सच्या मनात जागा नक्की निर्माण केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement