Appi Aamchi Collector : अप्पीच्या अर्जुनची कौतुकास्पद कामगिरी; लेकीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा
Appi Aamchi Collector : अप्पीच्या अर्जुनने हटके अंदाजात लेकीचा वाढदिवस साजरा केला आहे.
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता अप्पीच्या अर्जुनने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. अर्जुनने लेकीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा केला आहे.
अप्पीच्या अर्जुनची कौतुकास्पद कामगिरी
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतला इन्स्पेक्टर 'अर्जुन वर्षा विनायक कदम' म्हणजेच अभिनेता रोहित परशुरामच्या लहान मुलीला म्हणजेच रुईला 100 दिवस पूर्ण झाले. या निमित्ताने रोहितने एक छान छोटासा कार्यक्रम शाळेत साजरा केला.
लेकीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा
आजगाव मधील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत जाऊन रोहितने मुलांना परीक्षेसाठी आणि लेखनासाठी पॅड भेट दिले. रोहितने प्रेरणा देणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले व इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया म्हणजे राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, इंदिरा गांधी, प्रियांका चोप्रा, सायना नेहवाल आणि गीता फोगत यांचे चित्र आणि नुकताच यशस्वी झालेला चंद्रयानाचा क्षण लक्षात राहावा म्हणून त्याचेही चित्र स्टिकर पॅडवर लावले आहे.
View this post on Instagram
या भेटवस्तू सगळ्या मुलांना देतानाचे क्षण त्याने व्यक्त करताना सांगितले की,"त्या भेटवस्तू देताना निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप सुख देऊन गेला. त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी केल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व इतिहास घडवणाऱ्या स्त्रियांबद्दल माहिती दिली व चर्चा केली. या सगळ्या गोष्टींचं मुलांना खूप कौतुक वाटते.
लहान मुले नेहमी भेटवस्तूंसाठी उत्साहित असतात. हे सगळं करताना मला मनापासून खूप बरे वाटले. शाळेतील मुलं माझी खूप लाडकी आहेत तसेच ते माझे छान छोटे मित्र सुद्धा आहेत. आमचा तर पुढच्या वेळी सोबत बिर्याणी बनवून एकत्र मिळून जेवायचं प्लॅन पण आहे त्यासाठीही आम्ही खूप उत्साहित आहोत."
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचा विषय वेगळा आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.
संबंधित बातम्या