Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' रोमांचक वळणावर; अर्जुन अर्पणाला भेटणार का?
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे.
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. अर्जुन अप्पीजवळ पोहोचू शकेल का? अर्जुन आणि अप्पीची भेट होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अनेक रोमांचक घटना घडत आहेत. अनेक ट्विस्ट या मालिकेत घडणार आहेत. आतापर्यंतच्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं की अर्जुनची कोर्टात सुनावणी आहे आणि अप्पीला खूप ताप असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले आहे.
अर्जुन अप्पीच्या भोवती जमू लागले संकटांचे काळे ढग
अर्जुनची अत्यंत द्विधा मनस्थिती झाली असून त्याला अप्पीची खूप काळजी वाटते आहे. सर्व परिस्थिती आणि पुरावे अर्जुनच्या विरोधात आहेत. तर दुसरीकडे हॉस्टिपलमध्ये डॉक्टर सांगतायत अप्पीचा ताप उतरला नाही तर तिच्या बाळाला धोका होऊ शकतो. घरचे सर्व खूप घाबरले आहेत.
View this post on Instagram
अर्जुन अप्पीच्या भोवती जणू संकटांचे काळे ढग जमून आले आहेत, आता येईल का त्यातून एखादा सोनेरी आशेचा किरण? आता या सगळ्यातुन अर्जुनची सुटका होणार की त्याला शिक्षा होईल? अर्जुन अप्पीला भेटू शकेल का? असे प्रश्न मालिकाप्रेमींना पडले आहेत. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका प्रेक्षक संध्याकाळी 6.30 वाजता पाहू शकतात.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेबद्दल जाणून घ्या... (Appi Aamchi Collector)
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पी अर्थात अपर्णा मानेच्या भूमिकेत शिवानी नाईक आहे. एक वेगळा विषय या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.
संबंधित बातम्या