एक्स्प्लोर

Akshay Kumar, Kapil Sharma : अक्षय कुमारने फ्लॉप चित्रपटांचं खापर फोडलं कपिल शर्मावर! म्हणाला ‘याच्यामुळे माझे चित्रपट...’

Akshay Kumar : सध्या बॉलिवूडला ‘बॉयकॉट’चं ग्रहण लागलं आहे. यातच बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचे (Akshay Kumar) चित्रपट सलग फ्लॉप ठरले आहेत.

Akshay Kumar : सध्या बॉलिवूडला ‘बॉयकॉट’चं ग्रहण लागलं आहे. यातच बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचे (Akshay Kumar) चित्रपट सलग फ्लॉप ठरले आहेत. मात्र, आता त्याने आपल्या चित्रपटांच्या अपयशाचं खापर अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मावर (Kapil Sharma) फोडलं आहे. नुकताच अक्षय कुमारचा ‘कटपुतली’ (Cuttputli) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमारने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती.

कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच त्याच्या शोसह टीव्हीवर पुनरागमन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या शोचा नवीन प्रोमोही रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कपिलच्या नवीन शोचे शूटिंगही जोशात सुरू आहे. अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.

यंदाचं वर्ष अक्षय कुमारसाठी ‘फ्लॉप’

अक्षय कुमारसाठी यंदाचं वर्ष फार खास नव्हतं. या वर्षातला त्याचा चौथा चित्रपट 'कटपुतली' ओटीटीवर प्रदर्शित झाला असला, तरी या चित्रपटालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या आधी त्याचे 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'रक्षा बंधन' चित्रपटगृहात फ्लॉप झाले आहेत. नुकताच अक्षय कुमार त्याच्या ‘कटपुतली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान, तो कपिलला असे काही बोलला की, ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

अपयशाचं खापर कपिल शर्मावर...

‘द कपिल शर्मा शो’चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत अक्षय कुमारला पाहून कपिल शर्मा म्हणतो की, 'पाजी, तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष लहान कसे दिसता?’.  या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला, 'हा माणूस माझ्या प्रत्येक गोष्टीला खूप नजर लावतो. माझ्या पैशावर, माझ्या चित्रपटांवर... बघाना माझा कोणताही चित्रपट आता चालत नाहीय.' अक्षयचे हे उत्तर ऐकून कपिललाही थोडा धक्का बसला. मात्र, नंतर रकुल प्रीत आणि कपिल जोरजोरात हसायला लागले.

पाहा प्रोमो :

पहिल्याच भागात दिसणार अक्षय कुमार

गेल्या काही दिवसांपासून कपिल आणि त्याची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वाची तयारी करत आहेत. 'द कपिल शर्मा शो'च्या येत्या पर्वातील पहिल्या भागात अक्षय कुमार सहभागी होणार आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात अक्षय त्याच्या आगामी 'कटपुतली' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. त्यामुळे या भागात अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंह आणि सरगुन मेहतादेखील हजेरी लावणार आहेत.

संबंधित बातम्या

The Kapil Sharma Show Date Out : प्रतीक्षा संपली; 'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरमध्ये होणार सुरू

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो'चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्हीही होऊ शकता सामील, जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Kamali Serial: 'कमळी' मालिकेत नवा ट्विस्ट! कमळी अन् अन्नपूर्णा आजींची होणार भेट; मालिकेत रंगणार नवा अध्याय
'कमळी' मालिकेत नवा ट्विस्ट! कमळी अन् अन्नपूर्णा आजींची होणार भेट; मालिकेत रंगणार नवा अध्याय
Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री करतेय नवी सुरुवात, व्हिडीओतून दिली गुडन्यूज
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री करतेय नवी सुरुवात, व्हिडीओतून दिली गुडन्यूज
Ashutosh Kulkarni On Aadesh Bandekar: गुजराती निर्मात्यानं 5 महिने मानधन थकवलेलं, आदेश बांदेकरांनी मध्यस्थी करताच...; मराठी अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा
गुजराती निर्मात्यानं 5 महिने मानधन थकवलेलं, आदेश बांदेकरांनी मध्यस्थी करताच...; मराठी अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा
Ashvini Mahangade Bhushan Shivtare Wedding Photos: रंग माळीयेला... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ; लग्नाचे फोटो शेअर करुन दिली गूड न्यूज, कोण आहेत पतीदेव? PHOTOs
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ; लग्नाचे फोटो शेअर करुन दिली गूड न्यूज, PHOTOs

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Embed widget