Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्याने ठाण्यात सुरू केला स्वत:चा व्यवसाय; चहा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्याने ठाण्यात स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.
Aai Kuthe Kay Karte : हिंदीप्रमाणे मराठी (Marathi) मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारदेखील अभिनयाव्यतिरिक्त काही ना काही व्यवसाय करत आहे. कोणी कपडे, कोणी दागिने तर कोणी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आता या यादीत आणखी एका कलाकाराचा समावेश झाला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील एका अभिनेत्याने ठाण्यात स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णीने (Niranjan Kulkarni) ठाण्यात स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. निरंजनने ठाण्यात स्वत:चं कॅफे सुरू केलं आहे. सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा... कधी येताय प्यायला? : निरंजन कुलकर्णी
निरंजन कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. आता त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना चहा प्यायला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. या व्हिडीओमध्ये तो चहा बनवताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा... कधी येताय प्यायला?". निरंजनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते कमेंट्स करत त्याला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. चहा..., आलोच चहा प्यायला, नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा, लवकरच येऊ, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
निरंजन कुलकर्णीने ठाण्यातील घोडबंदर परिसरात कॅफे सुरू केलं आहे. या कॅफेचं नाव 'बडिज सँडविच' असं आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून निरंजन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत त्याने अरुंधतीच्या मोठ्या मुलाची म्हणजेच अभिषेक देशमुखची भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता तो खवय्यांच्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज आहे.
निरंजन कुलकर्णी हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर 25 पेक्षा अधिक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचा 'थ्रिलर नाइट' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच गेल्या वर्षी त्याने नेटफ्लिक्सच्या 'सोलकढी' या लघुपटाच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं.
संबंधित बातम्या