(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : 'हा निखळ आनंद...', मराठी अभिनेत्रीची राज ठाकरेंसाठी पोस्ट,उर्वशी ठाकरेंचेही मानले विशेष आभार
Raj Thackeray : मराठी अभिनेत्री शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेकडून करण्यात आलेल्या दीपोत्सवासाठी मराठी अभिनेत्रीने राज ठाकरेंचे विशेष आभार मानले आहेत.
Raj Thackeray : दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आकर्षक अशी रोषणाई करण्यात येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुढाकारुतनच ही संकल्पना साकारण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवसांतच मुंबईकरांसाठी हे सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्रस्थान असतं. यावरच अभिनेत्री तेजस्वीनी पंडित (Tejaswini Pandit) हिने पोस्ट करत राज ठाकरेंचे आभार मानलेत. तसेच तेजस्विनीने उर्वशी ठाकरे यांचेही विशेष आभार मानलेत.
तेजस्विनी पंडित हिने नुकताच राज ठाकरे यांच्यावर आधारित येक नंबर या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमाचीही बरीच चर्चा झाली. प्रेक्षकांच्याही पसंतीस हा सिनेमात उतरला असल्याचं चित्र बॉक्स पाहायला मिळालं. त्यानंतर आता तेजस्विनीच्या पोस्टचीही तुफान चर्चा सुरु आहे.
तेजस्विनीची पोस्ट काय?
तेजस्विनीने दीपोत्सावाचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, हा निखळ आनंद लोकांना तुमच्यासारखा निस्वार्थी माणूसच देऊ जाणे...राजसाहेब... त्यामुळे तेजस्विनीने दीपोत्सवानिमित्त राज ठाकरेंचे आभार मानले असल्याचं स्पष्ट झालंय.
उर्वशी ठाकरेंचे मानले विशेष आभार
दरम्यान तेजस्विनी पंडितने उर्वशी ठाकरेंचे विशेष आभार मानले आहेत. कारण तेजस्विनीचा हा व्हिडीओ उर्वशी ठाकरे यांनी शीवतीर्थावर काढला आहे. यावर तेजस्विनीने म्हटलं की, व्हिडीओ साभार.. उर्वशी ठाकरे... तेजस्विनी तिच्या सोशल मीडियावरुन राज ठाकरें यांच्या कार्याविषयी कायमच व्यक्त होत असते. तसेच ती त्यांचे वेळोवेळी आभारही मानते. आता दीपोत्सवासाठी केलेल्या रोषणाईसाठीही तेजस्विनीने राज ठाकरेंचे आभार मानलेत..
तेजस्विनी पंडीतबद्दल जाणून घ्या... (Who is Tejaswini Pandit)
तेजस्विनी पंडीत एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच. पण आता निर्मिती क्षेत्रातही तिने पदार्पण केलं आहे. 'बांबू' हा निर्मिती म्हणून तिचा पहिला सिनेमा आहे. तसेच 'अथांग' या वेबसीरिजची निर्मितीही तिने केली आहे. 'तू ही रे','येरे येरे पैसा','अगं बाई अरेच्चा' आणि 'फॉरेनची पाटलीण' अशा अनेक सिनेमांत तेजस्विनी पंडीतची झलक पाहायला मिळाली आहे. तेजस्विनीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram