(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunetra Pawar : निवडणुकीच्या धामधूमीत सुनेत्रा पवारांनी घेतली 'रोहित'ची भेट; म्हणाल्या, 'लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं...'
Sunetra Pawar : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे.
Sunetra Pawar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अभिनेता रोहित माने (Rohit Mane) हा घराघरांत पोहचला. रोहितच्या परफेक्ट टाईमिंगमुळे प्रेक्षकांना तो अगदी खळखळून हसवतो. अस्सल सातारकर असलेल्या रोहितने त्याच्या स्पेशल सातारी स्टाईलने महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. इतकच नव्हे अगदी राजकीय लोकांपर्यंतही रोहितचं काम पोहचलंय. कारण रोहितने नुकतीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेतली.
सुनेत्रा पवार यांनी रोहितसोबतच्या भेटीचा फोटोही शेअर केलाय. तसेच त्यांनी रोहितच्या कामाचंही यावेळी भरभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. रोहितने सुनेत्रा पवारांजवळ अजित पवारांना भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. इतकच नव्हे तर सुनेत्रा पवारांनीही रोहितला अजित पवारांची भेट घडवून देणार असल्याचा शब्द दिलाय.
सुनेत्रा पवारांची रोहितसाठी खास पोस्ट
सुनेत्रा पवार यांनी रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हे पुण्याईचेच काम. ते पुण्यकर्म आपल्या विनोदी अभिनयातून करणाऱ्या रोहित माने या अभिनेत्याची झालेली भेट आनंददायी.आमचे सहकारी धनवान वदक देशमुख हे रोहितचे नातेवाईक. त्यांच्याकडे रोहितने दादा, वहिनींना भेटता येईल का? अशी विचारणा केली. त्यामुळे ते रोहितला घेऊन भेटायला आले.
पुढे त्यांनी म्हटलं की, प्रवासात वेळ मिळाला, की काही ना काही वाचत, पाहत, ऐकत असते. त्यावेळी हास्यजत्रा पाहताना रोहित व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सादरीकरण हास्याची बरसात करणारे असते. त्याच आनंदाने रोहितशी गप्पा झाल्या. त्यामधे त्याचा नाटक, चित्रपट आणि हास्यजत्रा मधील प्रवास उलगडला. या भेटीबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.त्याला अजितदादांना देखील भेटायचे आहे. ती भेट नक्की घडवण्याचे त्याला सांगून त्याला व त्याच्यापाशी त्याच्या सर्व सहकलाकारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram