एक्स्प्लोर

Phulrani Teaser : 'झगा मगा हिला बघा...'; 'ही' अभिनेत्री साकारणार 'फुलराणी'; टीझर रिलीज

Phulrani : अभिनेता सुबोध भावेचा (Subodh Bhave) 'फुलराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) फुलराणीच्या भूमिकेत झळकणार आहे.

Phulrani Marathi Movie : अभिनेता सुबोध भावेचा (Subodh Bhave) 'फुलराणी' Phulrani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमात 'फुलराणी'ची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता लागली होती. 'ती येतेय... ती येतेय' असं म्हणत तिचं जोरदार प्रमोशन सुरु होतं. अखेर आज तिची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 'फुलराणी'च्या भूमिकेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहेचलेली प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) झळकणार आहे. 

'फुलराणी' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील फुलराणीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हटके स्टाईल, फाडू स्माईल, मनाने दिलदार असलेल्या फुलराणीचा दमदार स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्रियदर्शनी इंदलकर या सिनेमात शेवंता तांडे म्हणजेच फुलराणीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

सुबोध भावेने 'फुलराणी' या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"दिसते जरी अल्लड, आहे मोठी शहाणी, नडेल हिला जो त्याला पाजेल ही पाणी... भाषा जरी रावडी गाते गोड गोड गाणी, झगा मगा हिला बघा, आली आली 'फुलराणी". सुबोधच्या या पोस्टवर 'फुलराणी मनापासून आवडली', 'कळली फुलराणी...आवडली तिची रावडी वाणी, धमाल करणार अल्लज फुलराणी', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

'फुलवाली नाय फुलराणी बोलतात मला', 'मिस कोळीवाडा', 'झगा मगा मला बघा', टीझरमधील 'फुलराणी'च्या या डायलॉगने सिनेप्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता फुलराणीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

'या' दिवशी 'फुलराणी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला! (Phulrani Release Date) 

'फुलराणी' हा सिनेमा नवीन वर्षात पुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच येत्या 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर आधारित या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विश्वास जोशीने सांभाळली आहे. तर गुरु ठाकूरने या सिनेमाची कथा लिहिली आहे. तगडी स्टारकास्ट, दर्जेदार लेखन आणि उत्कृष्ट दिग्दर्शन या सगळ्या गोष्टींमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी शक्यता आहे. 

संबंधित बातम्या

Phulrani : हटके तिची स्टाईल, फाडू तिची स्माईल...दुनिया तिच्यावर फिदा; सुबोध भावेची 'फुलराणी' गुढीपाडव्याला फुलणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Playoffs Scenario: ऋषभ पंतच्या दिल्लीला अजूनही प्लेऑफची संधी, पण...
Playoffs Scenario: ऋषभ पंतच्या दिल्लीला अजूनही प्लेऑफची संधी, पण...
Jayant Patil : तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल; जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी प्लॅन तयार!
तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल; जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी प्लॅन तयार!
Anil Desai : सेनेच्या अनिल देसाईंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, चेंबूरमधून परत जायला लावलं; मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
सेनेच्या अनिल देसाईंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, चेंबूरमधून परत जायला लावलं; मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
करकरे, साळसकर, कामटेंचा जीव घेणाऱ्या गोळ्या कसाबच्या होत्या? की त्यांचा खून झाला? उज्ज्वल निकमांनी सत्य सांगावं; प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
करकरे, साळसकर, कामटेंचा जीव घेणाऱ्या गोळ्या कसाबच्या होत्या? की त्यांचा खून झाला? उज्ज्वल निकम यांनी सत्य सांगावं; प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Accident : फक्त होर्डिंगच नाही, घाटकोपरमधील पट्रेल पंप सुद्धा अनधिकृत...?Narendra Modi Nashik Lok Sabha : काठी, घोंगडं, टोपी आणि गमछा.. नाशकात मोदींसाठी खास भेटवस्तूHitendra Thakur Palghar Lok Sabha : बापाचं राज्य आहे का? हिंतेंद्र ठाकूर यांनी कुणाला दिला दम?Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 15 May 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Playoffs Scenario: ऋषभ पंतच्या दिल्लीला अजूनही प्लेऑफची संधी, पण...
Playoffs Scenario: ऋषभ पंतच्या दिल्लीला अजूनही प्लेऑफची संधी, पण...
Jayant Patil : तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल; जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी प्लॅन तयार!
तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल; जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी प्लॅन तयार!
Anil Desai : सेनेच्या अनिल देसाईंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, चेंबूरमधून परत जायला लावलं; मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
सेनेच्या अनिल देसाईंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, चेंबूरमधून परत जायला लावलं; मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
करकरे, साळसकर, कामटेंचा जीव घेणाऱ्या गोळ्या कसाबच्या होत्या? की त्यांचा खून झाला? उज्ज्वल निकमांनी सत्य सांगावं; प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
करकरे, साळसकर, कामटेंचा जीव घेणाऱ्या गोळ्या कसाबच्या होत्या? की त्यांचा खून झाला? उज्ज्वल निकम यांनी सत्य सांगावं; प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
Vishwajeet Kadam : भाजप प्रवेशाच्या आरोपांवर विश्वजीत कदमांचे सुटसुटीत उत्तर, म्हणाले...
भाजप प्रवेशाच्या आरोपांवर विश्वजीत कदमांचे सुटसुटीत उत्तर, म्हणाले...
'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका
'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका
Sanjog Waghere on Maval Loksabha : संजोग वाघेरेंचा मावळ लोकसभेला विजयाचा दावा; म्हणाले, श्रीरंग बारणेंना फक्त 'इथून' लीड मिळेल!
संजोग वाघेरेंचा मावळ लोकसभेला विजयाचा दावा; म्हणाले, श्रीरंग बारणेंना फक्त 'इथून' लीड मिळेल!
RCB Playoff : दिल्लीच्या विजयाचा फायदा आरसीबीला, पाहा प्लेऑफचं गणित  
RCB Playoff : दिल्लीच्या विजयाचा फायदा आरसीबीला, पाहा प्लेऑफचं गणित  
Embed widget