Phulrani : हटके तिची स्टाईल, फाडू तिची स्माईल...दुनिया तिच्यावर फिदा; सुबोध भावेची 'फुलराणी' गुढीपाडव्याला फुलणार
Subodh Bhave Phulrani Movie Poster Released : अभिनेता सुबोध भावेचा 'फुलराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Phulrani : हटके तिची स्टाईल, फाडू तिची स्माईल...दुनिया तिच्यावर फिदा; सुबोध भावेची 'फुलराणी' गुढीपाडव्याला फुलणार Subodh Bhave Phulrani Actor marathi movie Phulrani poster release will soon hit the screens Phulrani : हटके तिची स्टाईल, फाडू तिची स्माईल...दुनिया तिच्यावर फिदा; सुबोध भावेची 'फुलराणी' गुढीपाडव्याला फुलणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/b4807f0f921b69f09dc33360c7a8a8f71672732660961254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Subodh Bhave On Phulrani : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत सुबोध भावेने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
सुबोधचा 'फुलराणी' हा सिनेमा 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुर्हूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून एक अविस्मरणीय प्रेम कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Subodh Bhave Phulrani Movie Poster ; सुबोध भावेने शेअर केलं सिनेमाचं पोस्टर...
'फुलराणी' सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत सुबोधने लिहिलं आहे,"हटके तिची स्टाईल, फाडु तिची स्माईल, बिंधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा. नव्या वर्षाची अनाऊंसमेन्ट 'फुलराणी' फुलणार. आपल्या नवीन वर्षात अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 22 मार्च 2023 पासून सिनेमागृहांत".
View this post on Instagram
'फुलराणी' सिनेमाचे पोस्टर आऊट झाल्याने फुलराणीची भूमिका नक्की कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता आहेय पोस्टरमध्ये निळ्या डेनिमच्या आकर्षक रंगसंगती केलेल्या कपडयातील फुलांनी मढलेली, आत्मविश्वासाने मोबाईलवर बोलणारी, पाठमोरी ‘फुलराणी’ पहायला मिळत आहे.
सुबोधच्या 'फुलराणी' सिनेमाचं दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केलं आहे. तर विश्वास आणि गुरू ठाकूर यांनी या कलाकृतीचं लेखन केलं आहे. या सिनेमात विक्रम राजाध्यक्ष ही महत्त्वपूर्ण भूमिका सुबोध भावे साकारणार आहे.
'पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर 1964 साली आलेली 'माय फेअर लेडी' ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
Phulrani Movie : दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार सुबोध भावेची 'फुलराणी'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)