एक्स्प्लोर

The Kerala Story 2: 'द केरला स्टोरी'च्या सिक्वेलमध्ये अदा शर्मा गायब; कारण विचारताच म्हणाली, ' यावर बोलणं म्हणजे...'

'द केरला स्टोरी टू गोज बियॉन्ड' या चित्रपटात जुन्या स्टारकास्ट ऐवजी नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री अदा शर्मा केरला स्टोरीच्या दुसऱ्या पार्टमध्ये नसल्यामुळे तिचे चाहते निराश झालेले.

The Kerala story 2 Adah Sharma : गेल्या अनेक दिवसांपासून 'द केरला स्टोरी 2' या चित्रपटावरून वाद सुरू आहेत. प्रदर्शनाच्या अवघ्या एक दिवस आधी केरळ हायकोर्टाने चित्रपटाला अंतरिम स्थगिती देत निर्मात्यांना दणका दिला होता. नंतर चित्रपट प्रदर्शित झाला खरा, पण अजूनही या चित्रपटावर अनेक दिग्दर्शक निर्माते तसेच फिल्म क्रिटिक्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 'द केरला स्टोरी'च्या पहिल्या भागात अभिनेत्री अदा शर्मा प्रमुख भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केलेली. अभिनेत्री अदा शर्माही प्रचंड लोकप्रिय झाली. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द केरला स्टोरी टू गोज बियॉन्ड' या चित्रपटात जुन्या स्टारकास्ट ऐवजी नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री अदा शर्मा केरला स्टोरीच्या दुसऱ्या पार्टमध्ये नसल्यामुळे तिचे चाहते निराश झाले. मात्र, सिक्वेलमध्ये काम न केल्याबाबत अलीकडेच अभिनेत्री अदा शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली अदा शर्मा ?

'द केरला स्टोरी' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर आता 'केरला स्टोरी टू गोज बीयॉन्ड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिक्वेलमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून अदा शर्मा नसल्याने चाहत्यांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली होती. यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.  ती म्हणाली," मी ज्या चित्रपटाचा भाग असते त्या चित्रपटाबद्दल बोलायला मला आवडतं. पण ज्या चित्रपटात माझा सहभाग नाही त्या चित्रपटाबद्दल फक्त चर्चेत राहण्यासाठी बोलणं मला योग्य वाटत नाही. 'द केरला स्टोरी'च्या सिक्वेल साठी मला ऑफर आली होती की नाही हा विषय निर्माते आणि कलाकार यांच्यातलाच असतो आणि तो सार्वजनिकरित्या चर्चेत आणणं योग्य नाही' असं अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली.

ती पुढे म्हणाली ' पहिल्या भागात अफगाणिस्तानमधील आयसीसच्या कॅम्पबद्दल दाखवण्यात आलं होतं. एका निरागस मुलीला टप्प्याटप्प्याने कसं दहशतवादी बनवलं जातं हे त्यात दाखवण्यात आलेलं. पण दुसऱ्या भागाची कथा पूर्णपणे वेगळी आहे असं अदा म्हणाली.

चाहत्यांचे आभार मानले

'द केरला स्टोरी टू ' मध्ये अदा शर्मा दिसत नसल्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलेली. पहिल्या आणि दुसऱ्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईची ही चर्चा होत होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अदा शर्मा म्हणाली ' माझे प्रेक्षक मला खूप प्रेम देतात. त्यांना मला प्रत्येक चित्रपटात पाहायचं असतं. माझ्या पदार्पणाच्या 1920 पासून द केरला स्टोरी पर्यंत त्यांनी मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वीकारलं. 1920 मध्ये मी भीतीदायक भूमिका केली होती. द केरळ स्टोरीमध्ये गोड व्यक्तिमत्व दाखवलं. आणि सनफ्लॉवर मध्ये मी नकारात्मक भूमिकेत दिसले " असही ती म्हणाली.

सध्या अदा शर्मा काही नवीन प्रोजेक्ट्सच्या तयारीत आहे. यात एका बायोपिक सह ॲक्शन आणि हॉरर चित्रपटाचा समावेश आहे. अलीकडेच तिने हॉरर प्रोजेक्टसाठी केलेल्या ट्रान्सफॉर्मेशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. प्रोस्तेटिक मेकअपमधील तिचा लुक पाहून चहात्यामध्ये उत्सुकता वाढल्याचे दिसलं.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याने एकच खळबळ, टायगरसह चालक सुद्धा जखमी
अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याने एकच खळबळ, टायगरसह चालक सुद्धा जखमी
Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Embed widget