एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : लेकीची माफी मागणार राधा आई, होळीत होणार का दीपा-कार्तिकची दिलजमाई?

Rang Maza Vegla : सध्या दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात बरीच उलथापालथ होत आहे. आयेशामुळे या दोघांच्या नात्यात आणखी फूट पडली आहे.

Rang Maza Vegla : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दीपा आणि डॉक्टर कार्तिकची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली आहे. छोट्याशा कार्तिकी आणि दीपिकाने मालिकेत नवा ट्विस्ट तर आणलाच, पण आपल्या गोड निरागस अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा देखील मिळवली.

मालिकेत सध्या बरेच ट्विस्ट आणि कथेतील वळणं पाहायला मिळत आहेत. सौंदर्या इनामदारने बोल लगावल्यानंतर आता राधा आईच्या वागणुकीत बदल झाला आहे. इतकी वर्ष दीपाचा दुस्वास करणारी राधा आता तिची माफी मागून पुन्हा एकदा तिला इनामदारांच्या घरात परत आणणार आहे. श्वेताची काळजी घ्यायला दीपा इतकं जवळचं कुणीच नाही, असं म्हणत ती दीपाला इनामदारांच्या घरात घेऊन येणार आहे.

होळीत दूर होतील का दीपा-कार्तिकमधील गैरसमज?

सध्या दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात बरीच उलथापालथ होत आहे. आयेशामुळे या दोघांच्या नात्यात आणखी फूट पडली आहे. कार्तिकमुळे आपल्या आईला होणारा त्रास पाहून चिमुकली कार्तिकी देखील कार्तिकचा दुस्वास करू लागली आहे. यादरम्यान आता होळीच्या सणाचा माहोल सर्वत्र पाहायला मिळणार आहे. या रंगांच्या माहोलात आता दीपा-कार्तिकची दिलजमाई होण्याची शक्यता आहे. दोघांच्या नात्यातील गैरसमज दूर होऊन आता ते पुन्हा एकत्र येतील का?, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

मालिका टीआरपी शर्यतीत अव्वल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल आहे. या मालिकेतील सतत बदलते ट्रक आणि कथेतील ट्विस्ट मालिकेची रंगत वाढवत आहेत. शिवाय यातील कलाकारांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. छोट्याशा कार्तिकी आणि दीपिकाच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

एका मध्यमवर्गीय घरातील उपेक्षित आणि सावळ्या रंगाच्या दीपा या मुलीची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत तिने नेहमीच यश मिळवले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget