Shanaya Kapoor : बॉलिवूड पदार्पणाआधीच बनलीये स्टार, कोण आहे शनाया कपूर? जाणून घ्या...
Shanaya Kapoor : बॉलिवूडची लोकप्रिय स्टारकिड शनाया कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणारी शनाया पदार्पणापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे.
![Shanaya Kapoor : बॉलिवूड पदार्पणाआधीच बनलीये स्टार, कोण आहे शनाया कपूर? जाणून घ्या... Become a star before your Bollywood debut know about Shanaya Kapoor Shanaya Kapoor : बॉलिवूड पदार्पणाआधीच बनलीये स्टार, कोण आहे शनाया कपूर? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/62454bbd02239a485f33df3f8c700b74_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shanaya Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मता आणि दिग्दर्शक करण जोहरनं (Karan Johar) त्याच्या 'बेधडक'(Bedhadak) या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून त्यानं तीन नव्या कलाकारांना लाँच केलं आहे. या चित्रपटामधून संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय स्टारकिड शनाया कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणारी शनाया पदार्पणापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर हिने ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. ‘गुंजन सक्सेना: कारगिल गर्ल’मध्ये शनाया सहाय्यक दिग्दर्शक होती, तर तिची चुलत बहीण जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत होती.
आधीही केलेय काम!
अभिनेत्री शनाया कपूरने नेटफ्लिक्सचा चित्रपट 'द फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज'मध्ये कॅमिओ केला होता. यासोबतच अभिनेत्रीने 2019 मध्ये पॅरिसमधील ‘ले बाल’मध्येही काम केले आहे. शनाया कपूरचा जन्म 3 नोव्हेंबर 1999 रोजी झाला होता. कपूर घराण्याची लेक शनाया हिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल तिच्या दोन्ही बहिणी आणि भाऊ खूप उत्सुक आहेत. शनाया कपूर ही अभिनेत्री जान्हवी, खुशी कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर यांची बहीण आहे. यासोबतच शनाया ही बॉलिवूड सेलिब्रिटी किड्स सुहाना खान, अनन्या पांडे यांची बेस्ट फ्रेंड आहे.
सोशल मीडियावरही चर्चेत!
अनेकदा अनन्या पांडे, सुहाना खान आणि शनाया यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. शनाया कपूर आता चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा :
- Pawankhind : 'पावनखिंड' ला मिळालेल्या प्रतिसादावर चिन्मय मांडलेकरची भावनिक पोस्ट ; म्हणाला, 'आम्ही धन्य झालो!'
- Gangubai Kathiawadi : कोण आहे 'गंगूबाई काठियावाडी' मधील शांतनु महेश्वरी ? आलियासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत
- Majhi Tujhi Reshmigath : ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी...’, प्रेमाच्या धाग्याने विणली जाणार यश-नेहाची रेशीमगाठ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)