Mogal Mardini Chatrapati Tararani : सोनाली कुलकर्णी झळकणार 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या भूमिकेत; अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sonalee Kulkarni Mogal Mardini Chatrapati Tararani : 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराणी छत्रपती ताराबाई यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) मुख्य भूमिकेत असणार आहे. मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
सोनालीने शेअर केला टीझर (Sonalee Kulkarni Shared Teaser)
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सोनालीने या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे, "अवघ्या 25 वर्षांची मराठ्यांची राणी, जिने मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य जिंकायला आलेल्या औरंगजेबाला कायमचा या मातीत गाडला. सादर करत आहोत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'ची पहिली झलक".
View this post on Instagram
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या टीझरमध्ये काय आहे?
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमाच्या टिझरमध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे.
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राहुल जनार्दनने सांभाळली आहे. या सिनेमाबद्दल राहुल म्हणाला, "सिनेमा हे समाजप्रबोधनाचे आणि समाजजागरणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. पुढच्या पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणारे सिनेमे निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच प्रत्येत पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा आम्ही 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमाद्वारे प्रयत्न करत आहोत".
ताराराणींची भूमिका साकारणारी सोनाली कुलकर्णी म्हणाली,"छत्रपती ताराराणी... मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी. त्यांचे कार्य, कर्तृत्व दैदिप्यमान आहे. अशा तडफदार व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे".
संबंधित बातम्या