Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी मनकिरत औलखला क्लीन चिट, पुराव्यांअभावी गायकाची सुटका!
Sidhu Moose Wala Murder: पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी (Sidhu Moose Wala Murder) पंजाब पोलिसांनी गायक मनकिरत औलखला क्लीन चिट दिली आहे.
Sidhu Moose Wala Murder : पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी (Sidhu Moose Wala Murder) पंजाब पोलिसांनी गायक मनकिरत औलखला क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांना औलख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. गायक मनकिरत औलखवर सिद्धू मुसेवाला यांची माहिती गुंडांना दिल्याचा आरोप होत होता.
सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर, गँगस्टर दविंदर बंबीहा ग्रुपच्यावतीने गायक मनकिरत औलखचा मुसेवालाच्या हत्येत हात असल्याचे सांगण्यात आले. यानंतर लॉरेन्स बिश्नोई आणि मनकिरत औलख यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते आणि दावा केला होता की, दोघे खास मित्र आहेत. अशाच एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने स्वीकारली संपूर्ण जबाबदारी
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर गायक मनकिरत औलखही प्रसिद्धीच्या झोतात आला. अनेक गुंडांनी औलख याच्यावर खुनाचा ठपका ठेवला. तेव्हापासून औलख विरोधकांच्या निशाण्यावर आले होते.
पुरावे न मिळाल्याने क्लीन चिट
सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोषींचा पंजाब पोलीस अतिशय बारकाईने तपास करत आहेत. अशा स्थितीत काही मारेकरी पंजाब पोलिसांच्या हातीही लागले आहेत. त्याचवेळी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणा पंजाबी गायक मनकिरत औलखचे नाव जोडले जात होते. अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे एडीजीपी प्रमोद बन यांनी स्पष्ट केले आहे की, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मनकिरत औलखची कोणतीही भूमिका आढळून आलेली नाही, ज्या अंतर्गत त्याला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर संपूर्ण पंजाब फिल्म इंडस्ट्री हादरली आहे.
क्लीन चिट मिळाल्यानंतर औलख सोशल मीडियावर लाईव्ह आला आणि त्याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. तो म्हणाला, ‘सिद्धू मुसेवाला आज आपल्या सोबत नाहीत, हे खूप वाईट झाले. एका तरुण मुलाचे त्याच्या पालकांपासून अशा रीतीने वेगळे होणे खूप दुःखद आहे. सिद्धू हे संगीत क्षेत्रातील मोठे नाव होते.’
संबंधित बातम्या