(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sher Shivraj Song : राजं म्हणजे साक्षात शिव-शंभूचा अवतार, ‘शेरशिवराज’चं ‘येळकोट देवाचा’ प्रेक्षकांच्या भेटीला!
Sher Shivraj : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लिखित ‘येळकोट देवाचा’ (Yelkot Devacha) हे गाणं आघाडीचा गायक आदर्श शिंदे आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी गायलं आहे.
Sher Shivraj : ‘पावनखिंड’च्या यशानंतर आता प्रेक्षक शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinamay Mandlekar) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या लिरिकल व्हिडीओत मुख्य गाण्यातील काही झलक फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लिखित ‘येळकोट देवाचा’ (Yelkot Devacha) हे गाणं आघाडीचा गायक आदर्श शिंदे आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी गायलं आहे.
‘साक्षात शिव - शंभूचा अवतार, मावळ देशीचा शिवमल्हार...शिवबा आमचा तारणहार..’, असं कॅप्शन लिहित दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा गाण्याची झलक :
‘या’ दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
त्या काळी विजापूरच्या दरबारात 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'शेर शिवराज' चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काय आहे कथानक?
‘शेर शिवराज' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : कंगनाच्या लॉकअपमध्ये आपापसांतचं भिडली ‘टीम ब्लू’, पूनम पांडेशी वादानंतर अंजली अरोराची टास्कमधून माघार!
- Bhagya Dile Tu Mala : नवी मालिका अन् नवी भूमिका, ‘रत्नमाला’ स्वीकारण्याबद्दल निवेदिता सराफ म्हणतात...
- The Kashmir Files : ज्यांना 'द कश्मीर फाइल्स'ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha