Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: शशांक केतकरनं पोस्ट करुन त्या निर्मात्याला इशाराही दिलेला. पण, पोस्टमध्ये शशांकनं कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आता शशांकनं त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करुन निर्मात्याचं नाव घेऊन अनेक गंभीर आरोप केलेत.

Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतला (Marathi Film Industry) उत्तम दिग्दर्शक (Marathi Director). 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'हे मन बावरे' (Sukhachya Sarini He Man Baware), 'पाहिले न मी तुला' (Pahile Na Mi Tula), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या मालिकांमधून शशांक घराघरांत पोहोचला. शशांक सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय असून त्याचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स चाहत्यांना देत असतो. शशांक केतकरनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करुन एका मालिकेच्या निर्मात्याकडून मानधन थकवण्याचा आरोप केलेला. तसेच, शशांकनं पोस्ट करुन त्या निर्मात्याला इशाराही दिलेला. पण, पोस्टमध्ये शशांकनं कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आता शशांकनं त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करुन निर्मात्याचं नाव घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, निर्मात्यासोबत झालेल्या संभाषणाचे काही स्क्रिनशॉर्ट्सही शेअर केले आहेत.
मराठी अभिनेता शशांक केतकर नेमकं काय म्हणाला?
शशांक केतकर म्हणाला की, "नमस्कार, फायनली ती वेळ पुन्हा आली आहे, जिथे मी एखादा व्हिडीओ टाकतोय आणि व्हिडीओच्या माध्यमातून तक्रारी मांडतोय. मला माहीत आहे की, हा व्हिडीओसुद्धा वेगळ्या पद्धतीनं ट्रोल होणार आहे... काहींचं असं मत असेल की, चला आता पॉपकॉर्न घेऊन बसा, आता पुन्हा मनोरंजन होईल. काहींचं असेल की, हा फालतू तक्रारी करत राहतो, याचेच एकट्याचे पैसे अडकतात, यालाच एकट्याला इंडस्ट्रीत त्रास होतो... किंवा काहींचं मत असेल की, भाई हा बोलतो, शांत नाही बसत. वेगवेगळी मतं असतील. पण मी या इंडस्ट्रीत आहे, हा माझा व्यवसाय आहे आणि मी माझी सेवा देण्याचं काम करतो. सुदैवानं प्रत्येक मालिका आणि त्यातील काम प्रेक्षकांनी उचलून धरलं, त्याचं कौतुक केलं... निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यावरच ही इंडस्ट्री चालते."
शशांकने याबाबत पोस्टमधून मन हे बावरे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, व्हिडीओही शेअर केला आहे. पोस्ट करताना शशांक केतकर म्हणाला की, "मी कायदेशीर कारवाई करतोच आहे, पण तूर्तास मंदार देवस्थळी (मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा यासाठी हा व्हिडीओ स्क्रीनशॉटसहित पोस्ट करतोय आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गयावया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो..."
View this post on Instagram
बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही, सगळ्यांची आहे : शशांक केतकर
पुढे बोलताना शशांकनं म्हटलंय की, "5,00,000 ही एखाद्यासाठी मोठी रक्कम आहे की, नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालिकेचे पर डेप्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्याने पेमेंट देताना TDS कापला आणि सरकारला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे. बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही, सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे..."
"युट्यूबवर 4 वर्षपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न क्लिअर दिसतो. आणि आमच्या पैशाचं केलं काय याबद्दल चकार शब्द काढत नाही तो... असो, या पुढचा व्हिडीओ बाकी सगळ्या legal details सकट असेल. याच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला मी किंवा टीममधला कोणीही जबाबदार नसेल. इथे हे आवर्जून सांगावं लागेल सगळेच निर्माते असे फ्रॉड अजिबात नसतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त मंदार देवस्थळी याच्याबद्दल आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम निर्माते आहेत. त्यांना नक्की कळेल मी काय म्हणतोय ते. आम्ही उत्तम काम करून तुमचे प्रोजेक्ट चालवतो, तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमच काम उत्तम करा!", असंही शशांक केतकरनं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























