Actor Shramesh Betkar Maharashtrachi Hasyajatra: 'मी सेलिब्रिटी नाही, कामाचे पैसे घेतो...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकाराचं स्पष्ट उत्तर, नेमकं काय म्हणाला?
Actor Shramesh Betkar Maharashtrachi Hasyajatra: आपल्या कलेच्या जोरावर प्रसिद्ध झालेला श्रमेश अगदी ठामपणे सांगतो की, मी सेलिब्रिटी नाही. कारण मी माझ्या कामाचे पैसे घेतो.

Actor Shramesh Betkar Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्रभरातील (Maharashtra News) प्रेक्षकांना अगदी पोटधरुन हसवणारा शो म्हणजे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra). या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून सर्वच कलाकार अगदी घराघरांत पोहोचलेत. त्यापैकीच एक श्रमेश बेटकर (Shramesh Betkar). जेवढा श्रमेश आपल्या स्किटसाठी ओळखला जातो, तेवढाच तो लेखक आणि कवी म्हणून सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच श्रमेशनं पटकथा आणि संवाद लिहिलेला मराठी सिनेमा प्रदर्शित झालेला. 'लास्ट स्टॉप खांदा' (Last Stop Khanda) या श्रमेशनं लिहिलेल्या सिनेमाला मोठी प्रसिद्धी मिळालेली. पण, आपल्या कलेच्या जोरावर प्रसिद्ध झालेला श्रमेश अगदी ठामपणे सांगतो की, मी सेलिब्रिटी नाही. कारण मी माझ्या कामाचे पैसे घेतो.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता श्रमेश बेटकर काय म्हणाला?
संहिता क्रिएशन्सला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना श्रमेश म्हणाला की, "मी कधीच स्वत:ला सेलिब्रिटी समजत नाही. सेलिब्रिटी कोण, तर ज्याचं व्यक्तीमत्व साजरं करावसं वाटतं. आम्ही केलेल्या कामाचे पैसे घेतो. बाबासाहेबांनी कधी संविधान लिहिल्याचे पैसे घेतले नाहीत. बाबासाहेब किंवा महात्मा फुले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्याचे कधी पैसे नाही घेतले... त्यांनी स्वत:च्या मनापासून कार्य केलं. ते खरे सेलिब्रिटी!"
"आपण सेवक आहोत. मी अभिनय करतो, त्याचे मी पैसे घेतो. मी लोकांना हसवण्याचं काम फुकट केलं असतं, तर मी सेलिब्रिटी म्हणायच्या लायक झालो असतो. आपण केवळ नोकरदारवर्ग आहोत. खिशात एक रुपया असताना, समोरच्याला तो एक रुपया देण्याची ताकद ठेवणारी माणसं या जगात कमी आहेत. जे बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुलेंनी केलं. अशा लोकांना समजायला फार वेळ लागतो, पण समजल्यानंतर आपल्याला वेड लागतं...", असं श्रमेश म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























