Video : अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...
Virat Kohli, Anushka Sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीच्या व्हिडीओमध्ये अनुष्का तिच्या ड्रॉवरमध्ये केसांच्या क्लिप्स शोधताना दिसत आहे.
![Video : अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात... Virat Kohli finds a 'jugaad' to fix wires at home and Anushka Sharma's reaction is every annoyed Video : अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/25/0930b1c84327602a640e30c64b3e1436_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Virat Kohli, Anushka Sharma: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये सर्वात ‘लोकप्रिय जोडी’ आहेत. लोकांना त्यांची जोडी खूप आवडते. दरम्यान, या जोडीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांचा लूक आणि त्यांचे बाँडिंग लोकांना खूप आवडले आहे. हा व्हिडीओ एका जाहिरातीतील असून, त्यात अनुष्का काहीशी नाराज आणि दु:खी असल्याचे दिसते आहे. मात्र, त्याचे कारण जाणून तुम्हालाही हसू येणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीच्या व्हिडीओमध्ये अनुष्का तिच्या ड्रॉवरमध्ये केसांच्या क्लिप्स शोधताना दिसत आहे. मात्र, तिने तिचा ड्रॉवर उघडताच तो रिकामा दिसतो. क्लिपच्या शोधात खोलीतून बाहेर पडताच, तिला तिचा नवरा विराट वायर्स बांधण्यासाठी टीव्हीच्या कॅबिनेटभोवती केसांच्या क्लिप्स लावताना दिसतो. विराटचा हा जुगाड पाहून अनुष्का काहीच बोलत नाही, पण काही विचित्र एक्सप्रेशन देत कॅबिनेटमधून एक क्लिप घेऊन निघून जाते. मात्र, अनुष्काने तिथून क्लिप काढताच कॅबिनेटवरील सर्व वायर्स पुन्हा खाली पडू लागतात आणि विराटची सगळी मेहनत वाया जाते.
पाहा व्हिडीओ :
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काही कारणास्तव विराटने एका सामान्य क्लिपची ताकद कमी करण्याचा निर्णय घेतला.’ व्हिडीओमध्ये दोघांची केमिस्ट्री खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का बाथ गाऊनमध्ये दिसत आहे, तर विराट पंजाब लूकमध्ये धमाल करताना दिसत आहे. दोघेही त्यांच्या ऑन-स्क्रीन कॅरेक्टरमध्ये क्युट दिसत आहेत. या व्हिडीओ नेटकऱ्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या अनुष्का शर्मा तिचा पती विराट आणि मुलगी वामिकासोबत तिच्या सुंदर आयुष्याचा आनंद घेत आहे. ती बॉलिवूडपासून दूर असली, तरी सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनुष्का रोज तिच्या कुटुंबासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
हेही वाचा :
- RRR : आरआरआरच्या प्रमोशनसाठी आलियाचा खास लूक; साडीची किंमत माहितीये का?
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)