एक्स्प्लोर

Aruna Irani :  लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव 

Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री  अरुणा इराणी यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे.

Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्या त्यांच्या वैयक्तित आयुष्याबद्दल सहसा भाष्य करत नाहीत. परंतु, अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी लग्नाविषयी आणि लव्ह स्टोरीबद्दल सांगितले आहे. "लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करणं सोपं नसतं. लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करताना खूप अडचणी येतात, असं अरूणा इराणी यांनी म्हटलं आहे.

खरं तर अरूणा इराणी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुषात खूप चढ -उतार पाहिले आहेत. 80 ते 90 च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये अरुणा इराणी यांचे नाव अग्रस्थानी होतं. त्यांनी जवळपास 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अरुणा इराणी यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. करियरच्या सुरूवातीला अरुणा इराणी यांचे नाव महमूद यांच्यासोबत जोडले गेले होते. त्यावेळी महमूद यांचा विवाह झाला होता. त्या दोघांच्या नात्याबद्दल त्यावेळी खूप अफवा देखील पसरल्या होत्या. परंतु, नंतर अरूणा यांनी कुकू कोहली यांच्यासोबत लग्न केले. कुरू कोहली यांचं देखील आधीच लग्न झालं होतं. 

अरूणा यांनी सांगितलं की, "विवाहित पुरूषासोबत लग्न केल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागंत. सध्या माझे लग्न एका विवाहित पुरूषासोबत झाले आहे. माझं लग्न झालं होतं. पण याबाबत कोणालाही माहिती नव्हती. आता मला वाटतं की त्यावेळी कुकू कोहली यांच्या पत्नीला त्यावेळी किती अडचणींचा सामना करावा लागला असेल. एक वर्षापूर्वी कुकू कोहली यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मी बोलत आहे. अन्यथा त्यावेळी बोलण्याची माझी हिम्मत होत नव्हती. कारण मला कोणालाही दुखावू वाटत नव्हतं. कुकू कोहली यांच्यासोबतचे माझे संबंध, आमचं नातं हे कोणालाही दु:ख पोहोचवण्यासाठी किंवा कोणालाही कोणापासून वेगळं करण्यासाठी नव्हतं. ही माझी पहिलीच वेळी आहे की मी कुकू कोहलींसंदर्भात बोलले आहे.  

"मी त्यांच्याबद्दल कधीच बोलू शकले नाही... त्यांच्या आणि माझ्या नात्याबाबत त्यावेळी संपूर्ण  इंडस्ट्रीला माहीत होते, अगदी पत्रकारांनाही माहीत होते. विवाहित पुरुषाशी लग्न करणे एखाद्या व्यक्तीसाठी सोपे नसते, असे अरूणा इराणी यांनी यावेळी सांगितले.   

 त्यांनी म्हटलं की, 'मी आणि कुकू कोहली लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होतो. कुकू कोहली यांचं आधीच लग्न झालं होतं, त्यांना दोन मुली देखील आहेत. परंतु, आम्ही भेटलो होतो त्यावेळी त्यांचं लग्न झाले आहे याबाबद्दल मला माहिती देखील नव्हतं. नंतर मला ते आवडू लागले. पुढे आमची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यावेळी देखील त्यांचं लग्न झाल्याचं मला माहिती नव्हतं. त्यावेळी या विषयावर आम्ही बोलत देखील नव्हतो अशी आठवण अरूणा इराणी यांनी सांगितली. याबरोबरच आता मी यावर बोलत आहे कारण  कुकू कोहली यांच्या पहिल्या पत्नीचं एक वर्षापूर्वी निधन झालं आहे.  

अरुणा इराणी यांनी यावेळी अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल देखील एक खुलासा केलाय. रेखा यांच्यामुळे तुम्हाला ‘मंगळसूत्र’ या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, हे खरं आहे का? असा प्रश्न त्यांना मुलाखत घेणाऱ्याने विचारले. यावर बोलनाना त्यांनी सांगितले की,  "रेखा आणि माझी चांगली मैत्री होती. मी काही वर्षांपूर्वी ‘मंगळसूत्र’ नावाचा एक चित्रपट करत होते. या चित्रपटात मी एका अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारत होते. यात पहिल्या पत्नीचा मृत्यू होतो, ती भूत बनते, असे दाखवलं जाणार होतं. तर याच चित्रपटात रेखा ही दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारत होती. एके दिवशी अचानक मला निर्मात्याने तुला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी मला खूप चीड आली. त्यामुळे मी त्यांना याबाबत जाब विचारला. असे अचानक मला चित्रपटातून का काढून टाकले, काही अडचण आहे का? असे विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, रेखा यांना तुमच्याबरोबर काम करायचे नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे अरूणा ईराणी यांनी सांगितले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसानUddhav Thackeray On Devendra Fadanvis : आम्ही देशभक्त, मोदीभक्त नाही; फडणवीसांना ठाकरेंचं उत्तरTushar Gandhi : कट्टरवादी हिंदुत्वामार्फत लोकांमध्ये भेदभाव, तुषार गांधींची भाजपवर टीकाUddhav Thackeray Kalachowki Full Speech : शेवटची सभा, शेवटचं भाषण, काळाचौकीत ठाकरेंचा निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Embed widget