एक्स्प्लोर

TRP नसल्यानं 'सावित्री ज्योती' मालिका बंद! महेश टिळेकर यांचे फेसबुक पोस्टमधून प्रेक्षकांना प्रश्न

'नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे : महेश टिळेकर

मुंबई : दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर आपल्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते वादात सापडले आहेत. यावेळी सोनी मराठी या चॅनेल वरील मालिकेवरुन त्यांनी प्रेक्षकांना चांगलेच धारेवर धरले आहे. महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सावित्री ज्योती' ही मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहेत. यावरच प्रसिद्ध निर्माते महेश टिळेकरांनी सध्याच्या मालिका आणि त्यातील विषय यावर फेसबुक पोस्ट लिहीत आपलं परखड मत मांडलं आहे.

याला जबाबदार कोण? टिळेकर म्हणाले की, 'फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण या सगळ्यात चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?'

'नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कशाला म्हणायचं असा प्रश्न पडतो. पण पाहणारे हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानणारे आणि कामाच्या मिळालेल्या पैशांत सुख मानणारे कलाकार आहेत. बऱ्याचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रिअॅलिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि मर्यादा राखून लोकांचं मनोरंजन करणारे विनोदी कलाकारही आहेत.'

याला जबाबदार कोण? ’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी... Posted by Mahesh Tilekar on Sunday, 20 December 2020

उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल, की जीव तोडून मेहनत घेऊन टीआरपीच्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही. सावित्री ज्योती सारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी? असा प्रश्नही टिळेकर यांनी उपस्थित केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Embed widget