एक्स्प्लोर
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींची चौकशी सुरु
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांची चौकशी आज करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रकरणी 28 हून अधिक लोकांनी चौकशी झाली आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली आपला जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलिस स्टेशन सोमवारी दुपारी पोहोचले आहेत. रामलीला आणि बाजीराव मस्तानी चित्रपटाबद्दल पोलिस भन्साली यांची चौकशी करणार आहेत. पोलिसांना माहिती आहे की, हे दोन्ही चित्रपट सुशांतला ऑफर केले जाणार होते पण सुशांत हे चित्रपट करू शकला नाही. का करु शकला नाही? आणि या माहितीमध्ये किती तथ्य आहे? हे जाणून घेण्यासाठी पोलिस भन्साली यांचा जबाब नोंदवणार आहे.
सोमवारी दुपारी 12.30 वाजता संजय लीला भन्साली आपल्या कायदेशीर पथकासह वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाले. रामलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट सुशांत यांना ऑफर होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, पण एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर करार झाल्यामुळे सुशांत हे चित्रपट करू शकला नाही. हे चित्रपट न केल्यामुळे सुशांतच्या डिप्रेशनची सुरूवात झाली होती का? या माहितीत किती सत्य आहे. खरोखरच या दोन चित्रपटांमध्ये सुशांतला लाइन केलं जाणार होत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिस भन्साली यांच्याकडून जाणून घेणार आहेत.
भन्साली यांच्या जबाबानंतर समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे. त्याचबरोबर पोलिस भन्साली यांना सुशांतच्या इंडस्ट्रीमधील लोकांशी असलेले त्याचे प्रोफेशनल संबंध, संबंधांमधील तणाव, मतभेद याबद्दल माहिती घेणार आहेत. ज्यामधून सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात कोणतीही ठोस माहिती मिळू शकेल.
या प्रकरणात संजय लीला भन्साली हे 29 वे व्यक्ती असतील ज्यांचा जबाब नोंदवला गेला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजीराव मस्तानी आणि रामलीला या दोन चित्रपटांन संदर्भात संजय लीला भंनसाली यांची चौकशी करण्यात येणार आहे. बाजीराव मस्तानी आणि रामलीला या दोन चित्रपटांमध्ये आधी सुशांत सिंह राजपूत काम करणार होता. मात्र एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत असलेल्या करारामुळे तो हे चित्रपट करू शकला नाही. म्हणूनच सुशांत आणि यशराज फिल्म्स मधील असलेल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.
काही सूत्रांनी पोलिसांना माहिती दिली की, या प्रोडक्शन हाउस बरोबर संबंध बिघडल्यानंतर सुशांतला इंडस्ट्रीमध्ये एकटा पाडण्याचा प्रयत्न इंडस्ट्री धील काही मोठी लोक करत होती. ज्यामुळे सुशांतला काम मिळणं हा कठिण झालं होतं. मात्र सुशांतने आपल्या मेहनतीच्या जोरावर एमएस धोनी, पीकेसारख्या मोठ्या बॅनरच्या फिल्म मिळवल्या. पण तरीही तो स्वत:ला या इंडस्ट्रीमध्ये एकटाच समजायचा. ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेल्याचंही सांगितलं जातंय. म्हणून या माहितीमध्ये काय खरं आहे आणि काय खोटं हे जाणून घेण्यासाठी पोलिस संजय लीला भंसालीची चौकशी करणार आहेत.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास दिवसेंदिवस सखोल होत चाललेला आहे. आतापर्यंत 28 पेक्षा अधिक लोकांची चौकशी या संदर्भात करण्यात आली असून पोलिसांनी त्यांची स्टेटमेंट नोंदवलेली आहे. आतापर्यंत ज्यांची स्टेटमेंट नोंदवण्यात आली आहेत त्यामध्ये सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, तसेच फिल्म इंडस्ट्रीमधील त्याचे मित्र आणि सहकलाकार यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहेत. सुशांत सिंह राजपूत याने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केली. मात्र त्याच्या डिप्रेशनचं कारण काय? याचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement