सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर 'नेपोमीटर'च्या आधारे आलिया भट्ट हिचा 'सड़क 2' चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मधील घराणेशाहीवर आरोप होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सुशांतचा दाजी विशाल कीर्ति याने 'नेपोमीटर'च्या आधारे आलिया भट्ट हिचा चित्रपट 'सड़क 2' बॉयकॉट करण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीमधील घराणेशाहीवर आरोप होऊ लागले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची अमेरिकेत राहणारी बहीण श्वेता सिंह कीर्तिचा नवरा विशाल कीर्ति याने एक ट्वीट करुन हा मुद्दा उपस्थित केला आहे. घराणेशाही मोजण्यासाठी 'नेपोमीटर'ची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
याच 'नेपोमीटर'चा वापर करत आलिया भट्ट-पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूर स्टारर फिल्म 'सड़क 2' वर निशाणा साधला आहे. घराणेशाहीवर आरोप करत हा चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी मिळून केली आहे. तर महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
नेपोमीटरच्या आधारे सांगितलंय की, 'फिल्म 'सड़क 2' 98% नेपोटिस्टिक आहे. आम्ही या चित्रपटाचे 5 प्रकारे मुल्यांकन केलं आहे. निर्माता, लीड कलाकार, सहकलाकार, दिग्दर्शक और लेखक. या पाचही पॅरामीटरमध्ये चौघेजण बॉलिवूडमधील एकाच परिवाराशी निगडीत आहे. तुम्ही हा चित्रपट पहाल?
डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'सड़क 2' चित्रपट रिलीज करण्याची घोषणा इतक्यातचं केली आहे. अनेक चित्रपट, कलाकार यांच्या आभासी प्रेस कॉन्फरन्सिंगमध्ये आलिया भट्ट पण सहभागी होती. चित्रपटगृह बंद झाल्यानंतर 'सड़क 2' हा चित्रपट थेट डिजिटल प्लेटफॉर्म वर रिलीज करण्याविषयी ती खूपच उत्साहीत दिसली. माझी पहिल्यापासून इच्छा होती की वडील महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली एक दिवस काम करायला मिळावं. सडक 2 या चित्रपटातून ही इच्छा पूर्ण झाल्याचं आलिया म्हणाली.
टिकटॉक बॅनवर खासदार नुसरत जहाँ म्हणाल्या - 'नोटबंदीप्रमाणे सामान्यांचं नुकसान होऊ नये'
25 जूनला 'नेपोमीटर विषयी माहिती देताना सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा पती विशाल कीर्तिने ट्वीटरवर लिहलं होतं की, "बॉलिवूड मधील घराणेशाही विरोधात माहिती घेऊन लढा. आम्ही चित्रपटांचे मुल्याकन चित्रपटात काम करणाऱ्या क्रू च्या नेपोटिस्टिक अथवा स्वतंत्र होण्याच्या आधाराव करू. जर नेपोमीटरचा स्तर ऊंच राहिला तर समजून जा की बॉलिवूडमध्ये घराणेशाही बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे. सुशांत सिंह राजपूतचा भाऊजी विशाल कीर्तिने 25 जूनला 'नेपोमीटर'ला ट्वीटरवर इट्रोड्युस करतेवेळी लिहं होतं की भाऊ मयूरेश कृष्णा याने सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत याची निर्मिती केली आहे.
Nana Patekar visits Sushant's house | नाना पाटेकर सुशांत सिंह राजपूतच्या घरी, कुटुंबियांचं सांत्वन