Sandhya Mukherjee : प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांचं निधन ; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांचे काल (15 फेब्रुवारी) निधन झाले.
Sandhya Mukherjee : प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांचे काल (15 फेब्रुवारी) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा डॉक्टरांच्या असं लक्षात आलं होते की, त्यांना इस्केमिक हृदयविकार आणि LVF मध्ये मल्टी-ऑर्गन डिसफंक्शनने हे आजार देखील होते. त्यांच्या निधनाबद्दलची माहिती डॉक्टर शांतनु सेन यांनी ट्वीट करून दिली. संध्या यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता, असं शंतनु यांनी ट्वीटमध्ये सांगितले.
संध्या मुखर्जी या मुखोपाध्य नावानं देखील ओळखल्या जातात. त्यांनी यावर्षी प्रजासत्ताक दिना आधी पद्मश्री पुरस्कार नकारला होता. पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांची संमती मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकार्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी तो पुस्काराचा स्वीकार करण्यास नकार दिला.
Iconic Bengali singer Sandhya Mukherjee passes away at a private hospital in Kolkata, West Bengal. She was admitted here with critical health issues. pic.twitter.com/CKluEmhbPO
— ANI (@ANI) February 15, 2022
पद्मश्री पुस्काराच्या नामांकनाबाबत संध्या मुखर्जी यांना भेटण्यासाठी दिल्लीमधील वरिष्ठ अधिकारी आले होते. त्यावेळी त्यांच्या मुलीनं म्हणजेच सौमी सेनगुप्ता यांनी त्यांना सांगितले की त्या यासाठी तयार नाहित. सौमी यांनी सांगितले की , आठ दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या गायन कारकीर्दीत वयाच्या 90 व्या वर्षी पद्मश्रीसाठी निवड होणे हे संध्या मुखर्जी यांच्यासाठी अपमानजनक होते. त्यांना 'बंगा विभूषण' आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या
Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज बदलली, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha