Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज डेट बदलली, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित
Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
![Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज डेट बदलली, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित Laal Singh Chaddha Release of Aamir Khan movie Lal Singh Chaddha changed the movie will be released on this day Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज डेट बदलली, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/c183cb67d4f4ad1b74b1b2729faf563b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Laal Singh Chaddha Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'प्रभास' आणि 'सैफ अली खान'चा 'आदिपुरुष' सिनेमादेखील 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचे शूटिंग पूर्ण न झाल्याने निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात करिना आणि आमीरसोबतच अभिनेता नागा चैतन्य आणि मोना सिंह देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि तुर्की येथे झाले आहे. लाल सिंह चड्ढा हा टॉम हँक्स आणि रॉबिन राइट यांच्या फॉरेस्ट गंप या हिट चित्रपटाचा रिमेक आहे. आमिर खान, किरण राव आणि वायकॉम 18 स्टूडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
संबंधित बातम्या
Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'Jab Saiyaan' गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर
Anupam Kher : श्रीवल्ली गाण्यावर अनुपम खेर यांच्या आईने केला डान्स ; पाहा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)