एक्स्प्लोर

Samrenu Teaser : सम्या आणि रेणूची मनाला भिडणारी प्रेमकहणी ‘समरेणू’ ; टीझर रिलीज

Samrenu Teaser : 13 मे रोजी ‘समरेणू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Samrenu Teaser : ‘समरेणू’(Samrenu)तील सम्या, रेणू व संत्या यांचे चेहरे काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच 'समरेणू' चित्रपटातील शीर्षकगीताला देखील प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून टिझरच्या माध्यामातून आपल्याला सम्या आणि रेणूची एकमेकांमध्ये आकंठ बुडालेली प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 13 मे रोजी ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात महेश डोंगरे, रुचिता मांगडे, भारत लिमन हे मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन महेश डोंगरे यांनी केले आहे. 

टीझरमध्ये एका ठिकाणी सम्या आणि रेणूची हळूहळू बहरत जाणारी प्रेमकहाणी दिसत आहे तर सोबत बदल्याची आग मनात भरलेला संत्याही दिसत आहे. या दोघांमध्ये मनाची घालमेल होत असलेल्या रेणूचे आयुष्य एक वेगळ्याच वळणावर आलेले दिसत आहे. हे वळण नक्की कोणते असेल, यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

'समरेणू'चे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, " 'समरेणू' चित्रपट माझा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे माझ्यासोबत संपूर्ण टीमला या चित्रपटाची नक्कीच उत्सुकता आहे. सम्या आणि रेणू यांच्या प्रेमकहाणीत वेगळाच ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटातील संगीत टीम खूप अनुभवी आणि कसलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटासोबतच गाणी सुद्धा आवडतील."

एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget