एक्स्प्लोर

Visakha Subedar Son Stuck In Kuwait: 'मदत करा, माझा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय, त्याला परत आणा...'; मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची आर्त हाक, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनाही साकडं

Visakha Subedar Son Stuck In Kuwait: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा सध्या कुवेतमध्ये अडकला आहे. त्यांनी रडत रडत एक व्हिडीओ पोस्ट केलाय, त्या व्हिडीओ मुलाला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना साकडं घातलंय.

Visakha Subedar Son Stuck In Kuwait: इस्रायल (Israel) आणि अमेरिकेकडून (America) इराणवर (Iran) करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सध्या संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. मध्य पूर्वेतील तणाव (Israel vs Iran War) दिवसागणिक वाढत असतानाच, त्याचा परिणाम जगभरातील प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. इराणनं कुवेत, दुबईसह अनेक देशांवर हल्ले केल्यानंतर जगभरातील प्रवाशांवर त्याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीनंतर अनेक देशांनी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. तसेच, दुबई विमानतळही बंद करण्यात आलंय आणि अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीत. अशातच भारतातील अनेक प्रवासी आखाती देशांमध्ये अडकून पडलेत. दुबईत अडकलेल्या काही प्रवाशांना विमानानं मुंबई आणि बंगळुरूमध्ये आणण्यात आलं. पण, त्यासोबतच कुवेतमध्येही काही भारतीय अडकल्याची माहिती मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Visakha Subedar) यांनी एक व्हिडीओ शेअर करुन दिली आहे.  

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा सध्या कुवेतमध्ये अडकला आहे. अभिनेत्रीचा मुलगा लंडनला निघाला होता. मुंबईवरुन निघालेलं त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलं. पण, आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व उड्डाणं रद्द करण्यात आलीत. अभिनेत्रीचा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमधील एका हॉटेलमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. 

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी रडत रडतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमधून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं आहे. विशाखा सुभेदार यांचा मुलगा लंडनला गेला होता. त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलेलं आणि सध्या गेल्या चार दिवसांपासून तो कुवेतमध्येच अडकला आहे. तिथली परिस्थिती गंभीर झाली असून त्याला भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती विशाखा सुभेदार यांनी केली आहे.  

विशाखा सुभेदार नेमकं काय म्हणाल्या? 

विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये विशाखा सुभेदार यांनी आपल्या कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला भारतात सुखरुप आणण्याची विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. तसेच, हा व्हिडीओ शेअर करताना "कृपया मला मदत करावी. माझा मुलगा अभिनय कुवेतमध्ये अडकला आहे. #IndiaGovernment #NarendraModi #DevendraFadnavis देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, राज साहेब... कृपया मदत करावी...", असं कॅप्शन लिहिलंय. 

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या की, "नमस्कार मी विशाखा सुभेदार... माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे... माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र, कुवेतमध्ये त्याचं फ्लाईटमध्ये उतरवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून तिथं एअर स्पेस नसल्यामुळे विमानं रद्द करण्यात आली आहेत. माझा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकलाय. आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तिथे ड्रोन हल्ले होत आहेत. त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आमच्या मुलांची काळजी घ्यावी, ही विनंती सरकारला करतेय. लवकरात लवकर मार्ग काढावा..."

पाहा व्हिडीओ : माझा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय, त्याला सुखरूप परत आणा, Devendra Fadnavis यांना विनंती

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Suraj Chavan Gets Emotional In Memory Of Ajit Pawar: 'दादा कायम...'; अजित पवारांच्या आठवणीनं सूरज चव्हाण व्याकूळ, पत्नीसोबत आदरांजली वाहून म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Embed widget