Samara Tijori : दीपक तिजोरीची मुलगी म्हणाली, 'स्टार किड असल्याचा फायदा झाला नाही, 180 मुलींसोबत दिलं ऑडिशन'
एका मुलाखतीमध्ये समारानं सांगितलं की, तिला स्टार किड असल्याचा फायदा झाला नाही.
Deepak Tijori daughter Samara : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दीपक तिजोरीची (Deepak Tijori) मुलगी समारा तिजोरीनं (Samara Tijori) देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिनं अभिषेक बच्चनच्या बॉब बिस्वास या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिनं मासूम या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली. हॉटस्टारच्या या शोमध्ये समारासोबतच अभिनेते बोमन ईरानी यांनी देखील महत्त्वाची भूमिका सकारली आहे. एका मुलाखतीमध्ये समारानं सांगितलं की, तिला स्टार किड असल्याचा फायदा झाला नाही.
180 मुलींसोबत झालं ऑडिशन
मुलाखतीमध्ये समाराला प्रश्न विचारण्यात आला की, 'दीपक तिजोरी यांची मुलगी असल्यानं तुला बॉलिवूडमध्ये काही फायदा झाला का? यावर समारा म्हणाली, स्टार किड असल्याचा मला कोणताही फायदा झाला नाही. माझ्या वडिलांनी अॅक्टिंगनंतर ब्रेक घेतला. मी नॉर्मल ऑडिशन देऊन काम करण्यास सुरुवात केली. माझ्यासोबत ऑडिशन देण्यासाठी 180 मुली होत्या. ऑडिशनला मी मेक-अप देखील केला नव्हता. नंतर मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं.'
View this post on Instagram
समारानं सांगितला शूटिंगचा किस्सा
मासूम सीरिजमध्ये समारानं बोमन ईरानी यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा समाकानं सांगितला. ती म्हणाली, 'मी बोमन ईरानी यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले. एकदा बोमन हे सेटवर मजा मस्ती करत होते आणि मी माझ्या भूमिकेचा विचार करत बसले होते. सेटवर मजा करणारे बोमन हे दिग्दर्शक अॅक्शन म्हणताच सीनमध्ये रडू लागले. हे पाहून मी थक्क झाले. त्यांनी मला सांगितलं, फक्त ईमानदारीनं काम करायचं' समारा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करते.
संबंधित बातम्या