Samantha Ruth Prabhu : आधी नातं तुटलं, मग लग्नही मोडलं, आता समंथानं ‘ही’ खास भेटवस्तूही नागा चैतन्यला केली परत!
Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभू, नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित कोणत्याही आठवणी जवळ ठेवू इच्छित नाही.
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) वैयक्तिक आयुष्यात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. अभिनेता नागा चैतन्यशी (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या चाहत्यांना देखील जोरदार धक्का बसला होता. साऊथचं हे प्रेमी जोडपं कधी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेईल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र, आता ही जोडी एकमेकांपासून वेगळी झाली असून, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे सरकले आहेत. मात्र, आता समंथाने तिच्या आयुष्यातील खास भेटवस्तू देखील नागा चैतन्यला परत केली आहे.
समंथाने तिची लग्नातील साडी माजी पती नागा चैतन्यला परत केली आहे. या साडीचं नागा चैतन्याच्या कुटुंबाशी खास कनेक्शन होतं. ही साडी परंपरागत समंथाला मिळाली होती.
नागा चैतन्यच्या आजीचं खास कनेक्शन!
समंथा रुथ प्रभू, नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित कोणत्याही आठवणी जवळ ठेवू इच्छित नाही. काही रिपोर्ट्सनुसार, तिच्या लग्नाच्या साडीचा थेट संबंध नागा चैतन्यच्या आजीशी होता. ही साडी नागा चैतन्यच्या आजीची होती. समंथा यापुढे नागाच्या कुटुंबाशी संबंधित कोणतीही आठवण जवळ ठेवू इच्छित नाही. समंथाची जवळची मैत्रीण आणि डिझायनर क्रेशा बजाजने समंथाच्या लग्नापूर्वी या साडीला फायनल टच दिला होता. समंथा रुथ प्रभूची ही साडी इतकी सुंदर होती की, सगळ्यांच्याच नजर त्यावर खिळल्या होत्या.
4 वर्षांनी विभक्त झाली जोडी
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. या लग्नात दोन्ही कलाकारांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. ऑक्टोबर 2021 मध्येच ही जोडी विभक्त झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर सध्या समंथाकडे बॉलिवूड चित्रपटांची रांग लागली आहे. काही काळापूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसने समंथा रुथ प्रभूसोबत तीन चित्रपटांसाठी करार केला असल्याची चर्चा सुरु आहे.
हेही वाचा :
- Malaika Arora : 'लोक ढोंगी आहेत'; ट्रोलर्सला मलायकानं दिलं सडेतोड उत्तर
- Bachchan Pandey : अभिषेक बच्चन अन् चंकी पांडेसोबत खास कनेक्शन; असं ठरलं 'बच्चन पांडे' नाव
- JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha