JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!
JALSA Movie: 'जलसा' चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज केला आहे.
![JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला! JALSA First Look Poster Vidya Balan and Shefali Shah's first look reveled JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/f300994dbf4a302635aff6d06dc75f20_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
JALSA Movie: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) 'जलसा' (Jalsa) चित्रपटाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. आता तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची जास्त वाट पाहावी लागणार नाही. 'जलसा' चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज केला आहे. या लूकमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच गंभीर दिसत आहेत. मात्र, चाहत्यांना त्यांचा हा लूक आवडला आहे.
T-Series ने 'जलसा' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, "तुम्हाला माहित आहे की, हा एक अद्भुत अनुभव असणार आहे. जेव्हा दोन उत्कृष्ट कलाकार एकत्र येतील, तेव्हा जलसा असेल. ‘जलसा’ 18 मार्च रोजी प्राईम व्हिडीओवर!"
'जलसा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट खूप खास असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये विद्या आणि शेफाली शाह यांची जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.
पोस्टर शेअर करताना विद्या बालनने लिहिले की, "स्मिताच्या चेहऱ्यामागे खरी कहाणी आहे. जलसा 18 मार्चला रिलीज होणार आहे. मी खूप उत्साहित आहे." विद्याची ही कहाणी अनेक अर्थांनी खास असणार आहे. त्याचबरोबर शेफालीचा जबरदस्त लूकही पाहायला मिळणार आहे.
'जलसा' चित्रपटात विद्या बालन पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, दुसरीकडे शेफाली शाह ‘शेफ’च्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये दोघींचा सिंपल लूक प्रदर्शित करण्यात आला आहे, जो पाहताना खूपच गंभीर वाटतो. या चित्रपटात मानव कौलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :
- Anushka Sharma : अनुष्कानं केलं पेंटिंग ; नेटकरी म्हणाले, 'मजनू भाई'
- Deepika Padukone : 'वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला!' ; दीपिकानं केला गौप्यस्फोट
- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये नव्या पाहुण्याची एन्ट्री ; पाहा कोणामुळे झालं जेठालाल अन् भिडेचं भांडण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)