Saif Ali Khan and Amrita Singh Divorce : ...म्हणून माझा आणि अमृताचा घटस्फोट झाला; सैफ अली खानचा खुलासा
सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहीम ही दोन मुलं आहेत.
Saif Ali Khan and Amrita Singh Divorce: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. सैफचा आणि अमृता सिंहचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. सैफपेक्षा अमृता ही 12 वर्ष मोठी होती. तसेच त्यांनी 1991 मध्ये लग्न करून अनेकांना आश्चर्यचकित केले होते. सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहीम ही दोन मुलं आहेत. जेव्हा सारा 12 वर्षाची आणि इब्राहीम 4 वर्षाचा होता तेव्हा सैफ आणि अमृता यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
सैफने सांगितले होते घटस्फोटाचे कारण
एका मुलाखतीमध्ये सैफने सांगितले होते की, 'अमृताचे वाईट वागणे हे त्यांच्या घटस्फोटाचे कारण होते.' एका रिपोर्टनुसार, अमृता ही सैफच्या परिवाराला चांगली वागणूक देत नव्हती. घटस्फोटानंतर अमृताने सैफकडून पैसे घेतले अशी चर्चा होती. त्यावर एका मुलाखतीमध्ये सैफने खुलासा करत सांगितले होते की, 'एवढे पैसे द्यायला मी काय शाहरूख खान आहे का?' घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिने 2005 साली एकता कपूरच्या 'काव्यांजलि' या मालिकेत काम केले.
Spotted | तैमूरसोबत मास्क घालून आउटिंग करताना दिसले सैफ-करिना!
सैफ आणि करिनाची लव्ह स्टोरी
सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर हे 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. सैफने अभिनेत्री करिना कपूरसोबत 2012 साली लग्न केले. 20 डिसेंबर 2016 रोजी सैफ आणि करिनाला मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी तैमुर असे ठेवले त्यानंतर करिना आणि सैफला दुसरा मुलगा झाला त्यांच नावं त्यांनी जहांगिर असं ठेवलं आहे. अनेक वेळा करिना आणि सैफ या दोघांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी सैफचा भूत पोलिस हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातमध्ये सैफसोबत अर्जुन कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.